Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ६ मार्च, २०२०
होळीच्या बाजारपेठेलाही करोनाबाधा, सामुहिकरित्या होळी न खेळण्याचे आवाहन
प्रतिनिधी – करोनाचा प्रसार होण्याच्या भीतीने एकत्रित होळी न खेळण्याचे आवाहन समाजमाध्यमावरून केले जात आहे. याला प्रतिसाद देत अनेक गृहसंस्थांनी होळीचे कार्यक्रम रद्द केले आहेत. त्यामुळे बाजारपेठेला मंदीची आणखीन झळ सहन करावी लागणार आहे.
चीनमध्ये करोना विषाणूने कहर माजविल्याने तेथून होणाऱ्या आयातीवर र्निबध आले आहेत. चीनमधून होळीच्या रंगाची उधळण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पिचकाऱ्या, रंग यांचा पुरवठा जानेवारीपासून खंडित झाला आहे. त्यामुळे व्यावसायिकांनी जानेवारीआधी साठा करून ठेवलेल्या वस्तूंवरच सध्या होळीच्या बाजारपेठेची मदार आहे. या जोडीला भारतात तयार झालेल्या महागडय़ा वस्तूंची विक्री करण्यावर भर आहे. एकीकडे बाजारातील मंदीमुळे आधीच विक्री सुमारे ५० टक्क्य़ांनी घटलेली आहे. करोनामुळे त्यात आणखी भर पडण्याची धास्ती व्यावसायिकांना लागून राहिली आहे. नवीन माल नसल्याने ग्राहकांकडे खरेदीचे पर्यायही कमी आहेत.होळीनिमित्त एकमेकांच्या संपर्कात येऊन करोनाचा प्रसार होण्याची भीती खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून व्यक्त केली आहे.
चीनमधील ‘करोना विषाणू’च्या हाहाकारामुळे यंदा धुळवडीला चीन बनावटीच्या पिचकाऱ्या बाजारात हद्दपार झाल्या आहेत. होळीनिमित्त खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत असली तरी चिनी बनावटीच्या पिचकाऱ्यांना दूर ठेवण्यात आले आहे. भारतीय बनावटीच्या पिचकाऱ्या मोठय़ा प्रमाणावर बाजारात दाखल झाल्या आहेत. लहान मुलांमध्ये कार्टूनच्या पिचकारीला अधिक मागणी असते. मात्र यंदा करोनामुळे बाजारपेठेत भारतीय बनावटीच्या पिचकाऱ्या आल्या आहेत. ५० ते ८०० रुपयांपर्यंत पिचकाऱ्या आहेत. नैसर्गिक रंगांची किंमत ५० ते २५० रुपयांपर्यंत आहे. कार्टूनच्या आकारातील पिचकाऱ्या आकर्षकतेमुळे लहान मुलांच्या पसंतीला उतरतात. गेल्या वर्षी बाजारात चिनी वस्तू दाखल झाल्या होत्या. त्यापैकी २० टक्के वस्तूच बाजारात शिल्लक आहेत. सध्या शिलकीत असलेल्या पिचकाऱ्यांची विक्री केली जात असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
आज दि 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. अनुपकुमार यादव,सचिव महिला बालविकास विभाग, तसेच विलास ठाकूर सहसचिव यांच्याशी राज्यातील...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा