Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ९ जून, २०२६

घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ३ आरोपींसह एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात, २ लाख ७६ हजारांचा मुद्देमाल जप्त



नरडाणा / शिंदखेडा प्रतिनिधी :- धुळे जिल्ह्यातील 
शिंदखेडा तालुक्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांवर नरडाणा पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ आरोपी व एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेत तब्बल २ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईमुळे परिसरातील घरफोडीच्या दोन गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ जून २०२६ रोजी मध्यरात्री ते ७ जून २०२६ रोजी पहाटे दरम्यान शिंदखेडा तालुक्यातील दाबली येथे फिर्यादी श्री. अरुण रतीलाल पाटील यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम, सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने तसेच मोबाईल फोन चोरून नेले होते. याप्रकरणी नरडाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संशयितांचा शोध घेण्यात आला. त्यानंतर (१) गौरव सुरेश पवार (वय १९), (२) गोकुळ धनन मिल (वय २०), (३) बादल राजू सोनवणे (वय १८) आणि (४) एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी शिंदखेडा तालुक्यातील विविध ठिकाणी घरफोडी करून चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपांकडून १०
हजार रुपयांची रोख रक्कम, सोन्याची अंगठी, सोन्याचे कानातील दागिने, चांदीचे दागिने, बजाज पल्सर मोटारसायकल तसेच विविध कंपन्यांचे सहा मोबाईल फोन असा एकूण २ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईमुळे नरडाणा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक ९६/२०२६ आणि १०९/२०२६ या घरफोडीच्या दोन गुन्ह्यांची उकल झाली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय बवेर, उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत प्रभारी अधिकारी निलेश मोरे, पोउपनि. रविंद्र महाले, पोहेकॉ. विजय पाटील, पोहेकॉ. रविंद्र शिंदे, पोलीस अंमलदार ललित पाटील, राकेश शिरसाठ, गणेश पाटील, नारायण गवळी, भरत चव्हाण, योगेश गीते, अनासिंग पवार, धनेश कुकमुरी, रविंद्र मोराणे, विकांत देसले, चंद्रकांत साबळे, विजय माळी, विनोद काळे, प्रशांत पाटील, सचिन बागूल, अनिल सोनवणे, भरत भरे, सुनील पगारे, सुरजकुमार सावळे आणि होमगार्ड जितेंद्र राणीदे यांनी सहभाग घेतला.
घरफोडीच्या गुन्ह्यांचा छडा लावून आरोपींना अटक करण्यात यश आल्याने नरडाणा पोलिसांच्या या धडक कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध