Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १५ मार्च, २०२०
Home
/
Unlabelled
/
मुंबई आग्रा महामार्गावरून ट्रॅव्हल्स मधून तीन गांजा तस्करांना नरडाणा पोलीसांनी केली अटक
मुंबई आग्रा महामार्गावरून ट्रॅव्हल्स मधून तीन गांजा तस्करांना नरडाणा पोलीसांनी केली अटक
नरडाणा (प्रतिनिधी)राष्ट्रीय महामार्गारून प्रवासी ट्रॅव्हल्स बसमधून रात्रीच्या सुमारास गांजाची तस्करी करण्यात येणार असल्याची गोपीनय माहिती शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू यांना दि.१४ मार्च रोजी मिळाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार नरडाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू यांनी पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित,अपर पोलीस अधीक्षक डॉ. राजू भुजबळ, विभागीय पोलीस अधिकारी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या पथकाने मुंबई आग्रा महामार्गावरील नरडाणा रेल्वे पुलावर सापळा रचला होता.रात्रीच्या वेळी एमएच-१८-३३३० क्रंमांकची साई अभिषेक ट्रॅव्हल्स थांबवून चौकशी करीत तपासणी केली असता ट्रॅव्हल्स मधील प्रवासी प्रवीण सुनील रातांबे रा.डोंबिवली, सिद्धार्थ गोरख साबळे रा.अहमदनगर तसेच ज्योती लक्ष्मण गायकर रा.डोंबिवली यांच्या ताब्यातील बॅगेची तपासणी केली असता त्यांच्या बॅगेत ७६ हजार ८७२ रुपये किमतीचा ९ किलो ६०९ ग्रॅम गांजा मिळून आला. वरील तिघांना मुद्देमालसह नरडाणा पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात भाग ६ गुरनं ३२/२०२० मध्ये विविध कलमानव्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर कार्यवाही विभागीय पोलीस अधिकारी अनिल माने,सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू,पोलीस कॉन्स्टेबल महाले,पोलीस कॉन्स्टेबल गिरासे, चालक सूर्यवंशी, महिला पोलिस कॉन्स्टेबल ज्योती वाघ, महिला पोलिस कॉन्स्टेबल जाधव, महिला पोलिस कॉन्स्टेबल सोनगिरे यांच्या पथकाने केली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी :- दिंडोरी तालुक्यातील खत आणि कीटकनाशक विक्रेत्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून अनिश्चित क...
-
▶ अमळनेर (वा.) परिसरात अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांनी कारवाई करत ट्रॅक्टरसह वाळू असा सुमारे चार लाख रुपयांचा मुद्देमाल...




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा