Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, १५ मार्च, २०२०

रावेर ता.१४सोशल मीडियावर कोरोना व्हायरस बाबत मोठ्या प्रमाणावर मेसेज येत असून आज मात्र धामोडी व कांडवेल येथे संशयित रुग्ण सापडल्याचे झी24तास च्या स्क्रीनवर छेडछाड करून सोशल मीडियावर अफवांचे व्हायरल केले आहे .


रावेर:प्रतिनिधी:ता.१४सोशल मीडियावर कोरोना व्हायरस बाबत मोठ्या प्रमाणावर मेसेज येत असून आज मात्र धामोडी व कांडवेल येथे संशयित रुग्ण सापडल्याचे झी24तास च्या स्क्रीनवर छेडछाड करून सोशल मीडियावर अफवांचे व्हायरल केले आहे . यामुळे तालुक्यात मोठी चर्चा होती  मात्र सदर संशयीत रुग्ण तालुक्यातच नाहीत या अफवा आहेत सोशल मीडियावर छेडछाड करणाऱ्यांवर व फेक न्यूज तयार करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात  येईल अशी माहिती प्रांताधिकारी अजित थोरबोले व तालुका वैद्यकीय अधिकारी शिवराय पाटील यांनी  दिली .  

याबाबतचे वृत्त असे की  कोरोना व्हायरसचा फिवर संपूर्ण जगात सुरू आहे .


संपूर्ण देशात व ग्रामीण भागातही याची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे . या पार्श्वभूमीवर मोबाईलच्या सोशल मीडियावर यासंदर्भात कोरोना वरील उपाय, त्यावरील व्यंग, हास्य मैफिल यासह विविध मेसेज विविध ग्रुप वर येत आहेत. मात्र आज सायंकाळपासून काही ग्रुपवर रावेर तालुक्यातील धामोडी येथील एक संशयित रुग्ण आढळला व कांडवेल येथे प्रवीन वानखेडे हा संशयित रुग्ण आढळला असा मेसेज झी 24 तास च्या ४ मार्च च्या स्क्रीनवर छेडछाड करून सदर चा मेसेज ग्रुपवर टाकण्यात आला आहे . यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले व चर्चाही सुरू झाली . मात्र यासंदर्भात प्रांताधिकारी डॉ . अजित थोरबोले, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ . शिवराय पाटील यांच्याशी संपर्क केला असता रावेर तालुक्यात अशा प्रकारचा कोणताही रुग्ण नसल्याचे स्पष्ट केले . व त्या स्क्रीनवर चार मार्च तारीख असल्यामुळे झी24तास वरछेडछाड करून सदर स्क्रीनवर तयार करून सदर अफवा असलेले मेसेज मोबाईल वरील व्हाट्सअप वर व्हायरल ज्यांनी केला असेल त्यांना शोधून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे प्रांताधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी  बोलताना सांगितले .


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध