Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २६ मार्च, २०२०
जनतेनं ऐकलं नाही, तर प्लॉन बी तयार; डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितला 'उपाय'
कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे सरकारनंही सतर्कतेची पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांनी वैद्यकीय शिक्षण मंडळाचे संचालक असलेल्या डॉ. तात्याराव लहानेंशी बातचीत केली आहे.
राज्यातील परिस्थिती नियंत्रणात असून, अजूनही आजार दुसऱ्या टप्प्यात आहे. सगळ्याच नागरिकांनी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांचं ऐकलं आणि घरामध्ये राहिले तर हा आजार तिसऱ्या टप्प्यात जाणार नसल्याचंही डॉ. तात्याराव लहानेंनी स्पष्ट केलं आहे. पण लोक घरात राहिले नाहीत, तर तो तिसऱ्या टप्प्यातही जाऊ शकतो. हा अदृश्य शत्रू आहे, जो दिसत नाही, त्यामुळे तो कुठून, कसा हल्ला करेल हे लक्षात येत नसल्यामुळे घरात राहणं खूप महत्त्वाचं आहे. त्यावरच हा आजार पुढे किती प्रगती करेल हे अवलंबून आहे.
लोकांनी काळजी घेतल्यास कमी प्रमाणात त्याची लागण होईल. मुंबई पालिकेची बहुतेक सर्वच रुग्णालये आयसोलेशनसाठी वापरली जाणार आहेत. मुंबईत ३१५ आयसोलेशनच्या खाटा तयार असून, ७० खाटांमध्ये जिथे सीसीयू म्हणजे व्हेटिंलेटर्स, मॉनिटर्स लागतात, अशा खाटांची सोय आपण करत आहोत. बालरुग्णांना कामा रुग्णालयात पाठवण्यात येत आहे, तर बाकीचे रुग्ण जेजे हॉस्पिटलमध्ये पाठवत आहोत. प्रत्येक खाटेमध्ये ३ फुटांचं अंतर ठेवून सहा वॉर्ड तयार केले आहेत.
१८ वर्षांच्या खालील कोरोनाबाधित मुलांसाठी एक स्वतंत्र कक्षसुद्धा केला आहे. १८ वर्षांपर्यंतची मुलं या विशेष कक्षात ठेवण्यात येणार आहेत. सेंट जॉर्ज रुग्णालयात तशी व्यवस्था करण्यात आली असून, दोन दिवसांत ते पूर्णतः कार्यरत होणार आहे. महाराष्ट्रातलं कस्तुरबा, नायडू रुग्णालयं ही कोरोना समर्पित रुग्णालय असून, सेंट जॉर्ज रुग्णालयातही स्वतंत्रपणे विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. गरज पडल्यास जी. टी. रुग्णालयही रिकामी करून २५० खाटांचं नियोजन करणार असून, तिथेसुद्धा कोरोनाग्रस्त रुग्णांना ठेवता येऊ शकते. २९ तारखेपर्यंत ही सर्व रुग्णालयं कार्यरत होतील.
पुण्यात ११ मजल्यांच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचं बांधकाम पूर्ण झालं आहे. तिथे ६०० खाटा आयसोलेशनच्या आणि १०० खाटा क्रिटिकल केअर युनिटच्या सुरू करत आहोत. नागपूरमध्ये आपण ३०० खाटा आयसोलेशनच्या आणि ६० खाटा क्रिटिकल केअर युनिटच्या रुग्णांसाठी ठेवण्यात आल्या आहोत. इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या मदतीनं हे काम सुरू आहे. तात्याराव लहानेंना महाराष्ट्रातील लॅब संदर्भात विचारणा केली असता ते म्हणाले, २१ लॅब महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी सुरू करत आहोत. सध्या १२ लॅब सुरू झाल्या आहेत. बाकीच्या लॅबही लवकरच सुरू होणार आहेत. मुंबई, पुण्यात या लॅब आहेत, बाहेरच्या ठिकाणी या लॅब नाहीत. त्यासाठी आपण बी प्लॅन तयार केला आहे. लोकांनी ऐकलं आणि ते घराबाहेर न पडल्यास या लॅबची आणि बेड्सची आपल्याला गरज पडणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
उंटावद प्रतिनिधी :- शिरपूर खर्दे बुद्रुक रस्त्यावरील अरुणावती नदी पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून सळई देखील बाहेर निघाल्या आहेत. या भल्या मो...
-
शिरपूर प्रतिनिधी : थाळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हिसाळे गावात पोलिसांनी मोठी कारवाई करत जुगार अड्ड्यावर छापा टाकला आणि गावठी दारूची हातभट...
-
बेटावद (ता. शिंदखेडा) : बेटावद परिसरात शेतकऱ्यांवर अन्यायकारक प्रकार घडल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. गावातील शेतकरी मनोज दोधू...
-
त-हाडी प्रतिनिधी :-भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या निर्देशानुसार संपूर्ण भारतात राबविण्यात येत असलेल्या आर्थिक समावेशन मोहिमेअंतर्गत सेंट्...
-
प्रतीनिधी :- गणेश चव्हाण दिनांक 25 ऑगस्ट रोजी आधार संस्था अमळनेर तर्फे बालसंगोपन योजनेच्या लाभ घेणाऱ्या बालक व त्यां...
-
जळगाव प्रतिनिधी:- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्वीय सहाय्यक असल्याचे सांगून एका दाम्पत्याने जळगाव शहरातील तब्बल १८ नागरिकांची सुमारे ५५ ...
-
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील अंबारे येथील कर्तव्यावर शहीद झालेल्या जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबियांसह ग्...
-
पारोळा पोलिसांची धडक कारवाई , ४० लाखाचा मुद्देमाल जप्त अमळनेर : पारोळा तालुक्यातील बहादरपूर येथे बोरी नदीच्या काठावर पोलिसांनी धा...
-
नंदुरबार प्रतिनिधी:- नंदुरबार, दि. 26 ऑगस्ट 2025: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादा पवार यांच्या मार्गदर...
-
अमळनेर (प्रतिनिधी) अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध ठेवून तिला सात महिन्यांची गर्भवती करणाऱ्या धरणगाव तालुक्यातील निशाणे येथील तरुणांव...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा