Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ७ मार्च, २०२६
Home
/
Unlabelled
/
शिंगावे शिवारात आदिवासींच्या जमिनीवर तालुक्यातील प्रतिष्ठित व उच्चभृत व्यक्तींचा डल्ला; उच्च न्यायालयाच्या आदेशाचा वेगळा अर्थ लावत फसवणुकीचा डाव उघड!!
शिंगावे शिवारात आदिवासींच्या जमिनीवर तालुक्यातील प्रतिष्ठित व उच्चभृत व्यक्तींचा डल्ला; उच्च न्यायालयाच्या आदेशाचा वेगळा अर्थ लावत फसवणुकीचा डाव उघड!!
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!"
शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील मौजे शिंगावे येथील बहुचर्चित आदिवासींच्या जमीन प्रकरणात प्रशासनाने दिलेला ऐतिहासिक निकाल. तसेच उच्च न्यायालयाच्या 'जैसे-थे' आदेशाचा हेतू पुरस्सर चुकीचा अर्थ लावून आणि शासनाची परवानगी न घेता बेकायदेशीरपणे फेरफार नोंद केली.
महत्त्वाचे मुद्दे:
फसवणुकीचा डाव: आदिवासी जमिनीचे व्यवहार शासनाच्या परवानगीशिवाय स्वतःच्या नावे करण्याचा प्रयत्न झाला होता.
प्रशासकीय कारवाई: तक्रारदार यांच्या हरकतीची दखल घेत मंडळाधिकाऱ्यांनी ही नोंद रद्द करण्याचे आदेश दिले.
दणका: या निकालामुळे तालुक्यातील भूमाफियाना मोठा झटका बसला असून, जमिनीच्या व्यवहारातील मोठी अनियमितता चव्हाट्यावर आली आहे.
"कायद्याचे उल्लंघन करून महसूल दप्तरी झालेली नोंद कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही," असा कडक संदेश या निकालातून देण्यात आला आहे.
शिरपूर तालुक्यातील मौजे शिंगावे शिवारात आदिवासी बांधवांच्या मालकीच्या जमिनी हडपण्याचे एक मोठे रॅकेट सक्रिय असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. कोणताही अधिकृत आदेश नसताना, कायद्याचे उल्लंघन करून आदिवासींच्या जमिनी बिगर-आदिवासी व्यक्तींनी बेकायदेशीरपणे खरेदी केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात प्रशासनाने कडक पाऊल उचलत बेकायदेशीर फेरफार नोंद नामंजूर केल्याने भूमाफियांचे धाबे दणाणले आहेत.
या भू माफियांचे शासकीय कार्यालयातील नक्की प्रशासकीय सगे-सोयरे व हितचिंतक कोणते यांचा शोध घेऊन जिल्हा व तालुका प्रशासकीय अधिकारी काय कारवाई करतील यांच्याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.
सविस्तर बातमी पुढील अंकात....
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी :- दिंडोरी तालुक्यातील खत आणि कीटकनाशक विक्रेत्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून अनिश्चित क...
-
▶ अमळनेर (वा.) परिसरात अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांनी कारवाई करत ट्रॅक्टरसह वाळू असा सुमारे चार लाख रुपयांचा मुद्देमाल...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा