Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ६ मार्च, २०२०
Home
/
Unlabelled
/
राज्यातील संपूर्ण भोईसमाज एकत्रित करण्यासाठी तरूणांनी पुढे यावे... श्री अर्जुनभोई, मुंबई
राज्यातील संपूर्ण भोईसमाज एकत्रित करण्यासाठी तरूणांनी पुढे यावे... श्री अर्जुनभोई, मुंबई
समाजसेवकांनी, विचारवंतांनी, कृतीवंतांनी दिलेला समाज एकीकरणाचा इशारा आम्ही गंभीरतेने घेत आहोत ना..? राज्यात समाजक्रांती घडवून आणण्याकरिता आपल्यातील समाज संघटनांची एकरुपतेची जी व्याप्ती आज राज्यात होत आहे ती अजुनही वाढविणे हे सामाजिक एकीकरणाच्या माध्यमासाठी आवश्यक आहे. समाज हक्कासाठी, समाजक्रांतीचा काळ जवळजवळ आणण्याकरिता हे ही अत्यंत महत्वाचे आहे.
आज आम्ही अनेक संघटनांच्या माध्यमातून समाज एकीकरणाची व्याप्ती वाढवित आहोत की नाही याबद्दल ही खुल्या दिलाने चर्चा झाली पाहिजे कारण हे आपल्या सर्वांचे कर्तव्यच आहे आणि त्यातुन अनेक समाज संघटनांच्या एकीकरणाची व्याप्ती जर वाढत नसेल तर ती सामाजिक एकीकरणाच्या क्रांतीला पुरक असे कार्य होऊ शकणार नाही अशा वेळेस आम्ही फक्त वैयक्तिक विचार करीत बसलो आहोत असे ही होईल. तरी राज्यातील एकीकरणाची समाजक्रांती ही सर्व समाज घटकाद्वारे होत असतांना संपुर्ण समाज संघटनांनी समाज एकीकरणाची जाणीव स्वत:ला करुन घेणे अति आवश्यक आहे. तेव्हाच आमच्या भटक्या भोई समाजाच्या पुढे समाज क्रांतीकरिता पोषक वातावरण निर्माण होईल आणि ते करावयाचे मोठे कार्य हे ही आपलेच असेल..
समाजसंघटनांची व्याप्ती आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर समाज एकीकरण करणे ही आपली प्रथम अट असली पाहीजे. समाज एकीकरण करण्याचे हे ईश्वरीय कार्य संपुर्ण समाज कार्यकर्त्यानी समजून घेतले पाहिजे. चला, तर राज्यातून एक होऊ, नेक होऊ, समाज एकीकरणाच्या प्रवाहात आपले ही योगदान देऊ... जय महाराष्ट्र जय भोईराज...
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
आज दि 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. अनुपकुमार यादव,सचिव महिला बालविकास विभाग, तसेच विलास ठाकूर सहसचिव यांच्याशी राज्यातील...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा