Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ३१ मार्च, २०२०

नागपूरच्या पोलीस एक समाजसेवक, वर्दीतील माणूस





कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे अवघा समाज आपल्या कुटुंबासह जीव वाचवण्यासाठी घरामध्ये जाऊन बसला आहे तर दुसरीकडे आपले कुटुंब वाऱ्यावर सोडून जनतेचे रक्षण करण्यासाठी अहोरात्र झटणारे आमचे पोलीस बांधव हे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता राज्यातील लोकांना कोरोनाची लागण होऊ नये याकरिता रात्रंदिवस रस्त्यावर पहारा देत आहेत;


काही ठिकाणी गाणे गाऊन ,तर काही ठिकाणी प्रात्यक्षिक दाखवून लोकांना घरी राहण्याचे महत्व पटवून देत आहेत;

चोविस तास ड्युटी करत असतांना स्वतःचे कुटुंब कसे आहे हे माहीत नाही परंतू अडकून पडलेल्या व गरीब कुटूंबांना राशन देणे, जेवण देणे तसेच आर्थिक मदतही करणे इत्यादी प्रकारे एकप्रकारे समाजसेवा करतांनाचे व्हिडीओ सोशिअल मीडियावर व्हायरल होत आहेत;

यातून हेच सिद्ध होते की नियमांची कडक अंमलबजावणी करणारे आमचे पोलीस बांधव हे आतून कोमल मनाचे समाजसेवकच आहेत

आणि "सदरक्षणाय खलनिग्रहणाय" या महाराष्ट्र पोलिसांच्या ब्रीद वाक्याप्रमाणे आपले कर्तव्य पार पाडत आहेत.एस.पी.बावणे राज्य राखीव पोलीस बल महाराष्ट्र राज्य यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना
सांगितले.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध