Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ३१ मार्च, २०२०

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना पनवेल.


आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटना  पनवेल.
अंगणवाडी कर्मचारी, गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका यांना मिळणार २५ लाखांचे विमा संरक्षण..

अंगणवाडी कर्मचारी,गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका यांना १०००/-  प्रोत्साहन भत्ता मंजूर.

आपल्या राज्यात कोरोनाच्या साथीची लागण झाल्यापासून प्रादुर्भाव रोखण्यासाठी आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांना गाव पातळीवर शासन आदेशानुसार बाहेरून आलेल्या व्यक्तींचा सर्व्हे करणे, संशयित आढळल्यास माहिती देणे, स्वच्छता व काळजी घेणे, याप्रकरची कामे देण्यात आली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्या जिवाची पर्वा न करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना मध्यवर्ती सरकारने ५० लाखाचे विमा संरक्षण जाहीर केले.

या विमा संरक्षणापासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वंचित ठेवण्यात आल्याची बाब संघटनेच्या लक्षात आली.आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर अंगणवाडी कर्मचाऱ्यांनाही विमा संरक्षण देण्यात यावे. अशी आशयाची मागणी संघटनेने दि.२९ मार्च रोजी मा.मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली होती.

सदर मागणी अनुषंगाने राज्य शासनाने आज दि. ३१ मार्च रोजी ग्रामविकास विभागाचे उप सचिव मा.श्री. प्रविण द. जैन यांनी आदेश काढून गाव पातळीवर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काम आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र काम करणाऱ्या आशा, गटप्रवर्तक, अंगणवाडी कर्मचारी,ग्रामपंचारत कर्मचारी हे काम करीत आहेत. 

म्हणून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर या सर्वांना २५ लाखाचे विमा संरक्षण देण्यात यावे तसेच प्रत्येकी १०००/-रूपये  प्रोत्साहन भत्ता द्यावा असेही आदेशात नमुद केले आहे.सदर विमा ९० दिवसांसाठी जिल्हा परिषद स्तरांवर काढावा असे आदेश राज्यातील सर्व मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना दिले आहेत.

संघटनेने केलेली मागणी शासनाने तात्काळ मंजूर करून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. हे आपल्या संघटनेला मोठे यश मिळाले आहे. म्हणून आपण संघटीत राहून आपल्या शक्ती आणखी एकवटून संघटनेचे हात मजबूत करावेत आणि कोणाच्याहि भुलथापांना बळी पडू नये. असे आवाहन आम्ही करीत आहोत.

हमारी युनियन हमारी ताकत, हम सब एक है..

टिप - सर्व आशा, गटप्रवर्तक  व अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी या संकट समयी सेवा देत असताना स्वतःची व आपल्या कुटुंबाचीही काळजी घ्यायची आहे.

मायाताई परमेश्वर, रामकृष्ण बी. पाटील, युवराज बैसाणे, ॲड. गजानन थळे, दत्ता जगताप, सुमंत कदम, सुधीर परमेश्वर, अमोल बैसाणे, सर्व संघटना पदाधीकारी व कार्यकर्ते....



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध