Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, ३० मार्च, २०२०

नाशिक जिल्ह्यातही कोरोणाचा शिरकाव ; निफाड तालुक्यात सापडला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण



जळगाव प्रतिनिधी:संपूर्ण राज्यात हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाचा आता नाशिकमध्येही शिरकाव झाला असून निफाड तालुक्यात जिल्ह्यातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, निफाड तालुक्यातील लासलगांव जवळच्या पिंपळगांव नजिक येथील ३० वर्षाच्या रहीवासीला १२ मार्च रोजी खोकला व ताप अशी लक्षणे असल्यामुळे तेथील खाजगी डॉक्टरांकडे उपचारासाठी गेला होता. परंतु त्याला बरे न वाटले नाही म्हणुन तो २५ मार्च रोजी ग्रामीण रुग्णालय लासलगांव येथे उपचारासाठी गेला.

यावेळी न्युमोनियाची सदृश लक्षणे दिसत असल्यामुळे त्याला जिल्हा रुग्णालय नाशिक येथे संदर्भित केले.तो स्वत: च्या वाहनाने २७ मार्चला जिल्हा रुग्णालय नाशिक येथे उपचारासाठी दाखल झाला.त्याला जिल्हा रुग्णालय नाशिक येथील वैद्यकिय पथकाने विलगीकरण कक्षांत दाखल केले व त्याच्या घशातील स्रावाचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल नुकताच प्राप्त झाला असुन तो कोरोना विषाणु बाधित असल्याचा निष्कर्ष आलेला आहे. सदर रुग्णाची तब्येत स्थिर असुन त्याला कोरोना आजारासंबंधी येथील तज्ञ डॉक्टरांच्या पथकाकडुन उपचार करण्यात येत आहे.

उर्वरित कोरोना विलगीकरण कक्षातील दाखल रुग्णांचे घश्याच्या नावाचे स्वॉब निगेटीव्ह आहेत.सध्या कोरोना विलगीकरण कक्षांत ७ रुग्ण दाखल आहेत.त्यांची प्रकृती स्थिर असुन ती सुधारत आहे व त्यांना उद्या डिसचार्ज करण्यांत येणार आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या संनियंत्रणानुसार कोरोणा विषाणु पॉझीटीव्ह रुग्णाच्या घराच्या परिसरातील घरातील व्यक्तींचे साथरोग सर्व्हेक्षण पथकामार्फत सुरु करण्यांत आले आहे.तसेच या सर्व परिस्थितीवर विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी, आयुक्त मनपा नाशिक, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक, उपसंचालक आरोग्य सेवा नाशिक मंडळ नाशिक, जिल्हा शल्य चिकित्सक नाशिक जिल्हा आरोग्य अधिकारी, उप विभागीय अधिकारी व आरोग्य सेवेतील अधिकारी व कर्मचारी हे कारोना साथीच्या नियंत्रणासाठी लक्ष ठेवून आहेत. तसेच सदरचा अहवाल संचालक आरोग्य सेवा, आरोग्य आयुक्त व प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग यांना सादर केला आहे. नागरीकांनी घाबरुन जावु नये. आपण घराबाहेर पडु नका हात वरचेवर साबणाच्या पाण्याने स्वच्छ धुवा , आपला हात आपलेच नाक, तोंड, डोळे यांना लावण्याचे टाळा. असे आवाहन मा. जिल्हाधिकारी मनपा आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांनी केले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध