Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, ३० मार्च, २०२०

दोंडाईचातील उपजिल्हा रुग्णालयात सोशल डिस्टन्सींगचे पालन



दोंडाईचा प्रतिनिधी: येथे उपजिल्हा रुग्णालयात करोना विषाणूचा  पार्श्वभूमीवर एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी दोंडाईचा येथील उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. ललितकुमार चंद्रे व  उपजिल्हा रुग्णालय प्रशासनातील डॉक्टर्स, नर्स, कर्मचारी ,वार्ड बॉय आदींनी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांसाठी सोशल डिस्टंसींगचे नियोजन केले आहे यामुळे एकाच ठिकाणी मोठी गर्दी होण्याच्या धोका टाळला जात आहे. 

किरकोळ कारणांसाठी अथवा विनाकारण  उपजिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी करू नये असे आवाहन दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. चंद्रे यांनी केले आहे. तसेच दोंडाईचा उपजिल्हा रूग्णालय प्रशासनावर अतिरिक्त भार पडू यासाठी दोंडाईचा नगर परिषदेचे आरोग्य सभापती जितेंद्र गिरासे यांनी शहरातील खाजगी डॉक्टरांना त्यांचे हॉस्पिटल, दवाखान्यातील रूग्णसेवा सुरू ठेवण्याचे आवाहन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध