Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, ३० मार्च, २०२०

मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांनी आ. काशिराम पावरा यांच्याशी भ्रमणध्वनीवर प्रत्यक्ष संपर्क करून शिरपूर तालुक्याची परिस्थितीची केली विचारपूस,


आ. काशिराम पावरा यांनी केली शेतकरी, शेतमजूर, गोरगरिबांना मदत करण्याची मागणी 


शिरपूर प्रतिनिधी:महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांनी सोमवारी दि. 30 मार्च रोजी दुपारी 2.14 वाजता शिरपूर तालुक्याचे आमदार काशिराम पावरा यांच्याशी भ्रमणध्वनीवर प्रत्यक्ष संपर्क साधून शिरपूर तालुक्याच्या परिस्थितीची विचारपूस केेली. यावेळी आ. काशिराम पावरा यांनी विनंती केल्यानुसार शिरपूर तालुक्यातील सर्व मागण्यांची दखल घेवून लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येतील असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.


मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांच्याशी बोलताना यावेळी तालुक्याचे आमदार काशिराम पावरा यांनी कोरोना व्हायरस च्या प्रादुर्भावामुळे संचारबंदी चा फटका शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब जनतेला बसल्याचे सांगितले. महाराष्ट्र शासनाच्या वतीने व केंद्र सरकारने जाहीर केलेल्या संचारबंदी मुळे सर्व व्यवहार ठप्प झालेले असतांना जे शेतकरी व शेतमजुरांचे तसेच हातावर पोट असलेल्या गोरगरिबांचे प्रश्न आहेत त्याकडे लक्ष देण्याची विनंती केली. महाराष्ट्र राज्यभर व परराज्यात शिरपूर तालुक्यातील असलेले मजूर व नोकरीनिमित्त बाहेर गेलेल्या असंख्य महिला, पुरुष, मुलेमुली यांना शिरपूर येथे आणण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली. तसेच व्यवहार ठप्प झाल्यामुळे ज्या अनेक विविध पिकांचे, फळपिके व इतर भाजीपाला वाहतूक न झाल्यामुळे नुकसान झाले आहे त्याबाबत मदत देण्याची मागणी केली.

कोरोनाव्हायरस च्या पार्श्वभूमीवर सर्व थांबलेल्या व्यवहारामुळे शेतकरी बांधवांचे अतोनात नुकसान झालेले आहे.

शिरपूर तालुक्यातील वास्तव स्थिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे स्पष्ट करून आमदार काशिराम पावरा यांनी शिरपूर शहर व तालुक्यात गेल्या पंधरा दिवसापूर्वी अवकाळी पाऊस, वादळ व गारपिटीमुळे झालेल्या नुकसान बाबत सुद्धा माहिती देऊन नुकसानग्रस्तांना सहकार्य करण्याची विनंती केली.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध