Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १५ मार्च, २०२०
कोरोना कक्ष स्थापन
रावेर:प्रतिनिधीयेथील ग्रामीण रूग्णालयात कोरोनावर उपचारासाठी कोरोना तपासणी कक्ष स्थापन करण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी एन.डी.महाजन यांनी दिली.
कोरानाचा प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने सर्व शाळा व महाविद्यालयांना ३१ मार्च पर्यंत सुटी जाहीर केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार योग्य त्या उपाययोजना करत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आला आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी आणि गर्दी टाळण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खाजगी शाळा, महाविद्यालये ३१ मार्च पर्यत बंद ठेवण्याचेआदेश सरकारने दिले आहेत.
मात्र दहावी व बारीच्या परीक्षांबरोबरच विद्यापीठांमधील परीक्षा वेळापत्रकानुसारच घेण्यात येणार आहेत. कोरोना आजाराबाबत दक्षता घेत जागरूकता करण्यात येत आहे. त्यासाठी रावेर येथील ग्रामीण रूग्णालयात कोरोना तपासणी कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. तपासणी कक्षाबाबत डॉ. महाजन यांनी माहिती देतांना सांगितले की, कोरोना या आजारावर उपचार करण्यासाठी येथील ग्रामीण रूग्णालयात वार्ड क्र.२० मध्ये स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
या कक्षात रूग्णांसाठी कॅप, मास्क, प्लास्टीक अॅपरॉन, कापडी अॅपरॉन, चष्मा आदी ठेवण्यात आले आहेत. तीन बेडचे हे कक्ष स्वतंत्र असून रूग्ण आढळल्यास त्याची पुर्ण काळजी घेतली जाणार आहे. कोरोनाची लक्षणे दिसल्यास तात्काळ ग्रामीण रूग्णालयात तपासणीसाठी दाखल होण्याचे आवाहन डॉ. महाजन यांनी केले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा