Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, २५ मार्च, २०२०

कोरोनाच्या विषयावर सरकारला साथ देऊ या... श्री अर्जुनभोई


मुंबई प्रतिनिधी: कोरोना विषाणुमुळे
भविष्यात भारतात निर्माण होणारी परिस्थिती ही आपल्या गाफीलपणामुळे निर्माण होऊ नये यासाठी सतर्क राहू या किंबहुना तिला आटोक्यात आणण्यासाठी आपल्यावर काही वैयक्तिक निर्बंध लादुन घेऊ या तसेच कोरोनाच्या संकटांचा सामना करण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजना, आवाहन यांना मोठ्या गांभीर्याने घेऊन त्या आपल्याच आहेत 

ही भावना सुध्दा आपल्यात निर्माण करु या. आपल्यासमोर आलेल्या परिस्थितीला सामोरे जाऊन आपण ही त्यात मदत करु या... 

सल्ला देतांना वाटणारा मोठेपणा हा तोच सल्ला आपल्यावर ऐकण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा आपल्या कमीपणाचा गजर कधीही करु नका कारण मानवी जीवन हे एकदाच मिळत असते त्या जीवनाचा पुरेपूर आनंद घ्या आपल्या समोर आलेल्या परिस्थितीला मोठ्या धैर्याने सामोरे जाऊन त्या परिस्थितीचा मुकाबला करा.

भारतीय जनतेसमोर अनेक नैसर्गिक संकटांनी थैमान घातलेले आहे परंतु आमच्या एकीच्या कार्यातून ती सर्व संकटं आम्ही वेळोवेळी पार केली आहेत तसेच एक नैसर्गिक संकट कोरोना विषाणु रुपी आमच्या वर सतत घोंघावत आहे. 

त्याचा सुध्दा आपण मुकाबला करु या. मा पंतप्रधान नरेंद्र मोदीसाहेब, मा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेसाहेब वेळोवेळी करत असलेल्या सामाजिक आवाहनांना प्रतिसाद देऊ या आणि संकटाचा मुकाबला करु या असे सर्वञ आवाहन 

(माझा तरुण गर्जना) परिवार करत आहे. 

बडे बडे दौर गुजरे है जिंदगी के,
यह दौर भी गुजर जाएगा। 
थांम लो अपनों के पाव को घरों में,
अपना अनमोल जीवन बख्शा जाएगा।
Go back.... Corona

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध