Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, २९ मार्च, २०२०

विज्ञान एक वरदान




जीव निर्मिती होऊन अंनत काळा नंन्तर माणुस विज्ञान वादी बनला. असं म्हणतात पण हे खरं नाही असं मला वाटतं मानव तसा सुरवाती पासुन संशोधक असला पाहिजे नव्हे होता फक्त त्याच स्वरूप बदललं त्याला विज्ञान नाव दिल गेलं.

मानव निर्मिती नंन्तर सुरवातीला शोधक नजर ठेवुन सुरवात आग कशी पेटवायची ती निर्माण केली अन्न शिजवुन खाऊ लागला. स्वरक्षण साठी दगडा पासुन हत्यार बनवले. नंन्तर विळे गोफण कुऱ्हाड पुढे ढाल तलवार. पुढे तोफ बनवली.अणुबॉम्ब पर्यन्त पोहचलो.  

माती कोणती कशी त्या  पासुन भांडी बनवली.रंग शोधुन काढले.  नंन्तर जमिनीतुन खनिज काढु लागला लोखंड सोन चांदी शोधुन काढलं . त्या पासुन वस्तु बनवल्या पशु पक्षी यांना माणसाळून त्यांच्या मार्फत कामं करू लागला. ग्रह तारे यांचा अभ्यास करून वारे कसे वाहताय मग पाऊस कसा पडणार कोणते पक्षी कशी हालचाल करतात हे शोधुन बोध घेऊ लागला त्यांनी घरटं कुठं बांधली यावरून पण पावसाळ्याचा अंदाज घेऊ लागला.  कोणतं अन्न खायचं हे शिकला नंन्तर शेती करू लागला. 

अवकाश हालचाली शोधुन ग्रह ताऱ्यांना नाव दिली. आज अतिरिक्त वाढ म्हणजे नवीन शोध लागला असं आपण म्हणतो म्हणतं आलोय हे खरं .घोडे स्वारी नंतर घोडागाडी, बैलगाडी, सायकल, गाडी,  विमान पर्यन्त बनवले .अगोदर झोपडी मग घर महाल नंन्तर किल्ले  बनवु लागला. तराफा मग छोटया माणसं वलवणाऱ्या बोट. मग जहाज. लिखाण करू लागला अगोदर कोरड्या पानावर, मातीवर कापड मग कागदावर  बोरू वापर असे अंनत शोध पुर्वी माणसाने लावले  हे पुरातन काळ पासुन अविरत नवं नवीन शोध माणसाने लावले त्यात प्रगती होतं गेली आणि हवेत उडत अवकाश भ्रमण पर्यन्त माणुस पोहचला.. आजची साधनं पर्यन्त आला पण आज मानव जीवसृष्टीत आहे पण  जीवसृष्टी पासुन अलिप्त होतं जातोय.. पुर्वी पशु पक्षी चल अचल सृष्टी सोबत संवाद करत असे

आता तो वेळ नाही मानवा जवळ... त्या पासुन दुरावतोय असं वाटतं पण फायदे भौतिक सुख अंनत वाढले. शोध अंनत लागल्या मुळे..आपल्या सर्व गरजा पुर्ण करणारी, चमत्कारिक वाटणारी विविध रहस्य उलगडणारी शक्ती म्हणजे विज्ञान. एक परीस सारख लाभलेले  विज्ञान वाटतं. क्रांतिकारी नवं  नवीन शोध लागले  बरीच कामं यंत्र करू लागले  माणसाच्या खुप गरजा विज्ञान पुरवू लागल्या मुळे माणुस आळशी बनु लागला थोडा.. विज्ञान मुळे होणारा निसर्गावर अघाद खुप मोठा आहे समजुन न येणारा.. पण मानवास उंच नेणारं विज्ञान आहे.. अंधश्रद्धा मोडीत निघुन विज्ञान कास लोक धरत आहेत.. विज्ञानाने  साधनं सामुग्री ओघ प्रचंड  वाढतोय.   पुढे पचवता आलं पाहिजे मानवास फक्त. सृष्टीने ने अंगीकारले पाहिजे  विज्ञानि बोजा स्वीकारलं तर  कल्याण आहे नाही तर शाप ठरेल...

विज्ञान दिवशी लिहलेला लेख प्रसिद्धीस देण्यास राहिला होता आज पाठवतोय त्यात मी शेवटी लिहलं होतं  सृष्टीने स्वीकारलं पाहिजे  आताची वेळ काहीतरी  तसंच सांगते....


*****************************

काळ कलियुगी 

लबाडांची येथे चांदी 
खर्यांची आहे मंदी 
चढली वाईट धुंदी 
विकृत खोटी लफ़ंगी.... 

भ्रष्ट खुप दुनियामंदी 
लुबाडून महाल बांधी 
बहुत झालीत पाखण्डी 
घरात लपवता हंडी... 

जमवता लुटून गुंडी 
खाता सोन्याचांदी भांडी 
भरला  पापींचा  घडा 
 वाचला जातो पाढा.... 

जगजाहीर होतो लफडा 
महालावर पडतो हातोडा 
हरामी होतो वेडा 
निपजता  लंगडा पांगडा.... 

भोगता सात पिढ्या
पडत्तात बांधलेल्या माङया 
भोगभोगता येथेच गड्या 
उडतात रस्त्यावर चिंधळ्या.... 

काळ कलियुगी वाटतो 
सत्य रस्त्यावर झटतो 
चांगला येथे बाटतो 
खोटारडा लोकात वावरतो.... 

क्षणिक सारं त्रिखण्डी 
खर्यांचीच उरते नांदी 
 शेवटी तेथेच  सुख शांती 
लक्ष्मी सरस्वतीं नांदी.... 

प्रदीप मनोहर पाटील 
गणपूर ता. चोपडा 
जिल्हा. जळगाव 
मो. 9922239055©®



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध