Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २९ मार्च, २०२०
४०० युनिट पर्यंत विजेचा वापर करणाऱ्याचे वीज बिल माफ करा : आ.सुधीर मुनगंटीवार
चंद्रपुर:प्रतिनिधी:कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना अनेक आघाड्यांवर अडचणींचा सामना करावा लागत आहे. 14 एप्रिल पर्यंत देशात लॉक डाऊन घोषित करण्यात आले आहे .
त्यामुळे गरीब गरजू चिंतीत झाले आहे. या संकट समयी 400 युनिट पर्यंत विजेचा वापर करणाऱ्या गरीब व मध्यमवर्गीय वीज ग्राहकांचे वीज बिल माफ करण्यात यावे अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. कोरोना विषाणूच्या विरोधात जो लढा आपण सारे जण देत आहोत .
या संकटाच्या काळात शासनातर्फे गरीब गरजू नागरीकांना दिलासा देण्याची आवश्यकता आहे.लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट घेऊन जगणाऱ्या नागरिकांना तसेच मध्यमवर्गीय नागरिकांना अनेक अडचणी सहन कराव्या लागत आहे .
या
य परिस्थितीत 400 युनिट पर्यंत विजेचा वापर करणाऱ्या गरीब व मध्यमवर्गीय वीज ग्राहकांचे वीज बिल माफ केल्यास त्यांना मोठा दिलासा मिळेल अशी भावना व्यक्त करत याबाबत त्वरित निर्णय घेण्याची मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांच्याकडे केली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा