Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ३ मार्च, २०२०

सत्यशोधक विचार मंचला संत सावता गौरव पुरस्कार जाहीर



प्रतिनिधी:संत सावता महाराज यांच्या प्रेरणेने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय समाज प्रबोधन कार्य करून समाजाला दिशा देण्याचे महान कार्य करणाऱ्या संस्था संघटना, महिला मंडळे, पंच मंडळे यांना क्रांतीसुर्य महात्मा फुले जयंती सप्ताह निमित्त संत सावता गौरव पुरस्कार देण्यात येतो. 

चाळीसगाव तालुक्यातील पातोंडा येथील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सत्यशोधक विचारमंच ला जिल्हास्तरीय संत सावता गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे महात्मा फुले जयंती सप्ताह निमित्त रविवार १२ एप्रिल रोजी राष्ट्रपिता महात्मा जोतिबा फुले सभागृह क्षत्रिय फुलमाळी समाज संस्था अमळनेर येथे सावता प्रेरणा प्रबोधन विकास संस्था व क्रांतीसुर्य महात्मा फुले विचारमंच तर्फे नाशिक विभागीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय संत सावता गौरव पुरस्काराचे वितरण आहे. तेथे पातोंडा येथील सत्यशोधक विचारमंच ला स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देऊन जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. 

पुरस्कारासाठी कोणतेही प्रस्ताव मागविला नसून प्रत्यक्ष चौकशी करून माहिती गोळा करून सदर पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. पुरस्काराचे सर्वत्र कौतुक होत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध