Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ३ मार्च, २०२०
Home
/
Unlabelled
/
११ महीन्यापुर्वीचा गुन्हा उघड करुन ५० लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत शिरपुर तालुका पो.स्टे ची कार्यवाही
११ महीन्यापुर्वीचा गुन्हा उघड करुन ५० लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत शिरपुर तालुका पो.स्टे ची कार्यवाही
धुळे:प्रतिनिधी:भिवाडी, राजस्थान येथील एका कंपनीतुन जेसीबी व हारवेस्टर मशीन करीता उपयोगात येणारे १७१ नग टायर्स व टयुबने भरलेला एक ट्रक क्रमांक एच.आर.३८आर०५५५ पुणे येथे माल देण्याकरिता निघाला होता. त्यादरम्यान दिनांक ८/०५/२०१९ रोजी रात्री १०.०० वाजेच्या सुमारास सदर ट्रक हाडाखेड येथील आर.टी.ओ. चेक पोस्ट नाक्यावर आला असता सदर ट्रकच्या चालकास एका अनोळखी व्यक्तीने लिफ्ट मागून चालकास त्याच्या कडील थंड पेयाद्वारे गुंगीकारक औषध देवून सदर ट्रक मधील एकुण १७१ नग रबरी टायर व टायर करिताचे टयुब असा ऐवज पळवून नेला होता.
त्या संदर्भाने शिरपुर तालुका पो.स्टे.ला भाग-५ गुरंन ४१/२०१९ भादवी कलम ४२०, ३४ गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाच्या तपासादरम्यान अनोळखी आरोपींबाबत शिरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे शोध सुरु होता. तपासा दरम्यान अशा प्रकारे गुन्हे करणा-या विविध टोळयांचा अभ्यास सपोनि अभिषेक पाटील यांनी सुरु केला असता त्यातुन काही संशयीत व्यक्तींबाबत माहिती काढण्यात आली व काही संशयीतांची शिरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे पोलीस पथकाने विचारपूस सुरु केली होती.या विचारपूस दरम्यान काही संशयीत यांनी सांगीतलेली हकीकत, व गुप्त बातमीदार व साक्षीदारांकडुन प्राप्त माहीती विवीध ठिकाणील सीसीटीव्ही फुटेज, कॉल डीटेल्स व घटनाक्रम या वरुन संशयीत नामे
१) रविराज युवराज फुलमाळी वय.२९ धंदा-मजुरी हराकडोदरा चौफुली
कडोदरा ता.पलासना जि.सुरत
२) प्रविण आधार शिपी वय-२८ धंदा-ड्रॉयव्हर रा, प्लॉट नं. ८३ माऊलीनगर, वरखेडी रोड ,धुळे यांना अटक करण्यात आली. वरील दोन्ही अटक संशयीतांचा सदर गुन्हयात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असुन सदर गुन्हयात त्यांचे सोबत परराज्यात राहणारे इतरही काही साथीदार सहभागी असल्याचे आढळून आले असुन पोलीस कोठडी दरम्यान वरील दोघे संशयीत इसमांकडून सुमारे ५०,७१,५६०/- रुपये किंमतीचे (बाजारमुल्यनुसार) एकुण जे सी बी व हारव्हेस्टर मशीन करीता वापरण्यात येणारे रबरी टायर नग व १८१ रबरी टयुब १५८ नग असा मुद्देमाल त्यांच्या कडुन जप्त करण्यात आला आहे.
वरील अटक केलेले दोन्ही संशयीतांव्यतिरिक्त त्यांचे इतर साथीदारांचा शोध घेण्यात येत असून त्यांना देखील लवकरच अटक करण्यात येणार आहे.
सदर कारवाई मा. पोलीस अधिक्षक चिन्मय पंडीत, अपर पोलीस अधिक्षक श्री राजु भुजबळ उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपुर श्री.अनिल माने,यांचे
मार्गदर्शनाखाली सदर कार्यवाही
शिरपुर तालुका पो.स्टे स. पो. नि. अभिषेक पाटील,पो.हे.कॉ. लक्ष्मण गवळी, संजय देवरे,पो.ना.संजीव जाधव,पो.का.योगेश दाभाडे,गोविंद कोळी, योगेश मोरे, शाम पावरा यांनी कार्यवाही केली
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
वणी/ प्रतिनिधी :- दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आय सि ए आय ) द्वारे घेण्यात आलेल्या 'सीए फाय...
-
जिवा भावाची मैत्री' या सामाजिक उपक्रमांतर्गत सुरगाणा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष उप पोलीस निरीक्षक मनोज कुव...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा