Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २९ मार्च, २०२०
Home
/
Unlabelled
/
कोरोना पार्श्वभूमीवर पाण्यासाठी झुंबड उडू नये, म्हणून बोरी आणि अक्कलपाडा धरणाचे आवर्तन सोडा आमदार अनिल पाटील
कोरोना पार्श्वभूमीवर पाण्यासाठी झुंबड उडू नये, म्हणून बोरी आणि अक्कलपाडा धरणाचे आवर्तन सोडा आमदार अनिल पाटील
प्रतिनिधी अमळनेर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाण्यासाठी झुंबड होऊ नये यासाठी बोरी नदीत तामसवाडी धरणाचे व पांझरा नदीत अक्कलपाडा धरणातुन पाणी सोडुन येत्या महिन्यातील संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर आवर्तन सोडण्यात यावे अशी मागणी आमदार अनिल पाटील यांनी धुळे जिल्हाधिकारी गंगाधरण यांच्याशी चर्चा केली होती.
त्यावर जळगाव जिल्हापरिषदने आवर्तन मागणीचा प्रस्ताव पाठवला असून याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी बी एन पाटील यांनी माहिती दिली आहे. तर जळगाव जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांना बोरी धरणाबाबत देखील मागणी केली असून त्याबाबत लवकर निर्णय होणार आहे अशी माहिती आमदार अनिल पाटील यांनी दिली आहे.
अक्कलपाडा धरणामुळे अमळनेर तालुक्यातील ४० ते ४५ गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये आहे. यासाठी ही मागणी केली असून लवकरच धरणाचे पाणी सोडले जाईल.
यावर्षी अक्कलपाडा फुल झाल्यानंतर पाणी सोडल्याने फरशी टंचाई जाणवली नाही. तरीही मार्च महिन्यात पांझरा नदीपात्र कोरडेठाक झाले असल्याने असंख्य गावांच्या पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवायला लागली आहे. गेल्या पाच वर्षांपासून अक्कलपाडा धरणातून पांझरेत पाणी सोडण्यात येते. त्यामुळे या नदीकाठावरील गावांना विहीर अधिग्रहण अथवा पाणी टंचाई वणवण होत नाही.
अमळनेर तालुक्यातील मांडळ ते नीम कपिलेश्वर मंदिर या नदीसंगमापर्यंत काठावरील गावांच्या पाणीपुरवठा योजना या नदीवर आहेत. नदीपात्रातील पाण्याची पातळी खालावली कि पाणी योजनांना घरघर लागते. मग टंचाई सुरु होते. त्यामुळे आवर्तन सोडले कि पाणी टंचाई वरील अनाठायी खर्च कमी होतो. हे लक्षात घेता कोरोना पार्श्वभूमीवर यंदा पाणीटंचाईची झळ पोहचू नये .
या गावांना होणार फायदा – अमळनेर तालुक्यातील मांडळ वावडे, जवखेडा, मुडी, बोदर्डे, लोणसीम, लोणाचारम, लोणबु, लोणखु, भरवस, कळंबू, ब्राह्मणे, भिलाली, शहापूर, तांदळी, तर धुळे जिल्ह्यातील न्याहळोद, कौठळ, कंचनपूर, तामसवाडी, वालखेडा, अजंदे, बेटावद, पढावद आदि गावांना याचा गावाचा लाभ होणार आहे.
बोरीलाही आवर्तन सुटणार
पिण्याच्या पाण्यासाठी व शेतीसाठी बोरी नदीकाठावरील नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी आमदार अनिल पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे व गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता डी बी बेहरे यांच्याकडे चर्चा केली. त्यानुसार चर्चा होऊन एप्रिल महिन्यात बोरी नदीत पिण्याच्या पाण्यासाठी व शेतीसाठी आवर्तन सोडण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ ढाकणे यांनी आमदार पाटील यांना दिली.
कोरोना पार्श्वभूमीवर पाणी पिण्यासाठी उपयोगात येईल नदीकाठावरील गावांची पिण्याची पाण्याची समस्या सुटणार आहे. शिरसोदे, बहादरपूर, भिलाली, अंबापिंप्री, कोळपिंप्री, बोरीतील आवर्तनाचा लाभ कोळपिंप्री पर्यंतच्या गावांसह होत असून हे पाणी पुढे फापोरे, कन्हेरे, हिंगोणे बहादरवाडी, अमळनेर व पुढील गावांना होणार असून हे पाणी सोडल्यानंतर याठिकाणी मंगरूळसह १० गावांच्या पाणीपुरवठा योजनांच्या विहिरी असल्याने त्या योजना जिवंत होतील व शेतकऱ्यांना दिलासा मिळेल
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी :- दिंडोरी तालुक्यातील खत आणि कीटकनाशक विक्रेत्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून अनिश्चित क...
-
▶ अमळनेर (वा.) परिसरात अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांनी कारवाई करत ट्रॅक्टरसह वाळू असा सुमारे चार लाख रुपयांचा मुद्देमाल...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा