Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २९ मार्च, २०२०
गरीब लोकवस्तीत दिव्यांग सेने च्या वतीने दूध व बिस्किट वाटप
राजु तडवी फैजपुर प्रतिनिधी संपूर्ण जगात कोरोना विषाणू चे मृत्यू तांडव सुरू असताना विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने अंमलात आणलेल्या लॉकडाऊन मुळे गरीब वस्तीत लहान मुले, स्त्रिया व वृद्धांना बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे.
समाजऋण फेडण्याच्या वृत्तीतुन दिव्यांग सेना, फैजपूर चे अध्यक्ष श्री नाना लक्ष्मण मोची व सहकाऱ्यांच्या वतीने दूध व बिस्किट वाटप करण्यात आले. यात प्राध्यापक लेफ्टनंट राजेंद्र राजपूत, अजय मेढे, लोकेश कोलते, गिरीश कापडे, अजय जोरेवाल, आकाश जोरेवाल, संजय मेढे, नितीन इंगळे, मंगेश सावकारे, संजय वानखेडे, बबन तायडे, विक्की जोगी, बाळा कोळी व शिव कॉलनी मित्र मंडळ सदस्य यांनी पुढाकार घेऊन गरिबांना दूध व बिस्किटांचे वाटप केले. संपूर्ण देशात लॉकडाऊन मुळे कामगार व हात मजुरी करणाऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
त्यासाठी फैजपूरचे प्रांताधिकारी मा. डॉ. अजित थोरबोले व पोलीस निरीक्षक मा प्रकाश वानखेडे यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून दिव्यांग सेनेने हा उपक्रम राबवला.
यापुढेही समाजातील गरजू घटकाला आवश्यक ती मदत पुरविण्याचा मानस दिव्यांग सेना कार्यकर्ते व शिव कॉलनी मित्र मंडळाने केला आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्राप्त माहितीनुसार एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी शिंदखेडा तालुक्यातील दरणे व रोहाणे या दोन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या विषय...
-
नाशिक प्रतिनिधी : शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेला धुळे येथील प्रशांत वाडिले या...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा