Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, ३० मार्च, २०२०

कोरोना व्हायरस मुळे काहि छोट्या व्यवसाय वाल्यान वर व मजुरावर आली उपासमारी वेळ



शेगांव बुलढाणा प्रतीनिधी भास्करराव नंदाने
कोरोना व्हायरस मुळे संपूर्ण जग होरपळून गेल्यामुळे देश चे देश लोक डाऊन झाले आहे देशातील मंदिर मस्जिद बंद झाले आहेत त्या मुळे सर्व घटकांतील जनतेला कोरोना व्हायरस चा फटका बसु लागला आहे संत नगरी शेगांव येथे श्री संत गजानन महाराज देवस्थान असुन येथे देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त येत असतात त्यामुळे येथे फुटपाथवर जास्तीत जास्त गोरगरीब लोग आपला छोटा मोठा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करीत आहेत परंतु देशावर एवढे मोठे कोरोना व्हायरस चे संकट आल्या मुळे संपूर्ण देश लोक डाऊन करावा लागला आहे त्या मुळे सर्व घटकांतील लोग आता घरी बसले आहेत त्या मुळे त्या छोट्या व्यवसाय करणाऱ्या वर उपासमारी ची वेळ तर आलीच आहे 

त्याही पेक्षा जे लोक मातकाम करीत होते हमाल शेतमजुर या सारखे कामगार या कोरोना व्हायरस मुळे सर्वाचे रोजी रोटी बंद पडली आहे या मजुरांना व छोट्या व्यवसाय करणाऱ्या व्यवसायाना रोज कमवा आणि रोज खा असी असल्याने या व्यवसाईकावर व मजुरावर आता मात्र उपासमारी ची वेळ आली आहे शेत मजुर आतापर्यंत कसातरी कापुस वेचनी करत होता तोही कापूस वेचणी बोडी नसल्या मुळे रोजगार बंद झाला आहे तर पुर्वी गहु सोगणी होत असे परंतु नवीन  टेक्नॉलॉजी आल्या मुळे गहु सोगणी कढण्या करीता मशनिरी आल्या आहेत त्या मुळे आता मात्र तेही काम नाही

तर हाच मजुर मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह चालवत होता तेच कोरोना व्हायरस  चे संकटआल्या मुळे संपुर्ण देश लोक डाउन मुळे छोट्या व्यवसाय करणाऱ्या व्यवसाईकावर व हात मजुरांन वर उपासमारी ची वेळ आली आहे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध