Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ३० मार्च, २०२०
Home
/
Unlabelled
/
महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रकार व त्यांच्या कुटुंबासाठी मदतीचे विशेष पॅकेज देण्याची मागणी
महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रकार व त्यांच्या कुटुंबासाठी मदतीचे विशेष पॅकेज देण्याची मागणी
जनता कर्फ्यू व लॉकडाऊनमुळे
पत्रकार व त्यांच्या कुटुंबासाठी मदतीचे विशेष पॅकेज मिळणेबाबत व पत्रकार बंधूना पोलीसांकडून वृतांकण करताना मारहाण व अडवणूक न होणेबाबत महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र
शिरपूर:प्रतिनिधी: राज्यात कोरोना सारख्या महाविषाणूचा फैलाव जोरात सुरु होताच आपण घेतलेल्या लॉकडाऊनचा स्तुत्य निर्णय घेतलात.त्याबद्दल आपले सर्वप्रथम पत्रकार बांधवांच्यावतीने मनःपूर्वक अभिनंदन!. कोरोनाच्या संकटाचा सामना महाराष्ट्रातील नागरिक करीत आहेत,त्यामुळे महाराष्ट्र सरकारने जनता कर्फ्यू व लॉकडाऊन सारखे अनेक चांगले मोठे निर्णय घेतले असून अाम्ही आपल्या निर्णयाचे स्वागत करीत आहोत.
पोलीस,डॉक्टर व प्रशासकीय यंत्रणेबरोबर पत्रकार,प्रेस फोटोग्राफर बांधवही आपल्या जिवाची पर्वा न करता जनजागृती करीत आहेत.हे काम करीत असताना काही ठिकाणी पत्रकार बंधूंनाही पोलीसांनी मारहाण केली.तेंव्हा ओळखपत्र असणा-या पत्रकारांना पोलीसांनी मारहाण अथवा अडवणूक करु नये अशी मागणी आहे.
तसेच अनेक पत्रकारांना निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे खुप अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.तेंव्हा पत्रकार मग तो प्रिंट मिडीयाचा असो किंवा इलेक्ट्रॉनिक मिडीयाचा असो या सर्वांचा गांभीर्याने विचार करून अन्य घटकांप्रमाने त्यांना आर्थिक मदतीचे पँकेज द्यावे तसेच या कालावधीत पत्रकारांच्या वाहनांना पेट्रोल/डिझेल चा पुरवठा सुरळीतपणे व्हावा अशी महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष विलासराव कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, पदाधिकारी यांनी आज केला.
दिनांक 30 मार्च 2020 रोजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना मेल निवेदन देतेवेळी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष ईश्वर बोरसे शिरपूर तालुका अध्यक्ष हेमंत चौधरी पंकज पंकज पाटील राजेंद्र खैरनार मनोज पावरा संदेश हजारे यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा