Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २७ मार्च, २०२०

कोरोनामुळे हातावर पोट भरणाऱ्यांची होतेय उपासमार


समाजातील सर्वच घटकांना आता कोरोनाचा फटका बसू लागला आहे.

तरी कोरोनामुळे सर्वाधिक दयनीय अवस्था झालेली दिसून येते ती म्हणजे राज्यातील शेतमजूर,छोट्या मोठ्या व्यवसायातील रोजंदारी मजूर कामगार ,हमाल,माथाडी कामगार,छोटे उद्योग व्यावसायिक त्यातून रोजगार मिळवणारे कामगार ,बँड किंवा कॅटरिंग चालवणारे व्यावसायिक, बालकामगार, घरकामगार,या क्षेत्रातील असंघटिक वर्गाची ‘कमवा आणि खा ‘ या वर्गात मोडणाऱ्या आणि हातावरच पोट असलेल्या या लोकांवर कोरोनामुळे 

अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे.

आपल्या शिरपूर तालुक्यात हजारो शेतमजूर आहेत.आणि सद्या पडणाऱ्या उन्हामुळे शेतीची कामे कमी झालेली आहेत.

आणि आता मात्र कोरोनाच्या भीतीने आजची कामे उद्यावर ढकलणे सुरू आहे.ऊस तोडणी कामे शेवटच्या टप्प्यात आहेत.आता शिवरातून नजर फिरवली तर जाणवते की जणू शुकशुकाट झाला आहे.गहू पीक पंजाब मधून आणलेल्या मशीन च्या साह्याने काढला जातो आहे. हरभरा कापणीचे तुरळक असे कामे शिल्लक आहेत.

तालुक्यात बांधकाम मजूर आहेत त्यांची संख्या काही हजारात येईल त्याच्या व्यवसायात आधीच अभुतपुर्व मंदी सुरू आहे त्यातल्या त्यात वाळूचे ठेके गेलेले नाहीत त्यामुळे ते मिळेल त्या भावात काम सुरू होते.पण सद्या चे चित्र असे आहे की बांधकाम क्षेत्रात कोरोना मुळे जे प्रकल्प सुरू होते ते आता बंद पडले आहेत.त्यामुळे या क्षेत्रातील कामगारांवर उपासमारीची वेळ आलेली दिसत आहे.
शिरपूर तालुक्यात घरकाम करणाऱ्या महिलांची संख्या (खासकरून शहरात) मोठी आहे. मिळेल ती रोख रक्कम व उरले सुरले अन्न हेच या वर्गाचे उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे.पण सद्या कोरोनाच्या संपर्काच्या धास्तीने अनेक घरातील घरकामगारांचा त्या त्या घरातील प्रवेश बंद झाला आहे.

शिरपूर तालुक्यात कंपन्याची कमतरता नाही त्या सुध्दा बंद पडल्या आहेत किरकोळ उद्योग व्यावसायिक उद्योजक आहे यामध्ये मंच्छी व चिकन मटन  विकणारे छोटी हॉटेल,चहाच्या गाड्या,पान टपऱ्या ,खाद्यपदार्थची गाडे,निरनिराळ्या प्रकारच्या वस्तू विक्रेते,धाबे ,पंक्चर काढणारे,सायकल ,मोटर सायकल दुरुस्ती करणारे, शीतपेय विक्रेते,वेफर्स विक्रेते,मिठाई वाले,लॉटरी विक्रेते अशा सारखे शेकडो व्यवसाय करणारे यांचा यात समावेश होतो.

आशात शिरपूर शहर वाशियाना घरपट्टी पाणीपट्टी कशी बरायची आसा प्रश्न निर्माण होत आहे 

आजकाल कोरोनामुळे एकामागून एक शहरे लॉक डाऊन ,कारखाने शटरडाऊन होत असल्याने चलनचालती प्रचंड प्रमाणात मंदावल्यामुळे यांचा व्यवसाय मोडून पडला आहे.या वर्गाची अवस्था थोड्याफार प्रमाणात अशी आहे 

की ‘ताजा लाना ताजा खाना’ किंवा ‘आज कमायेंगे तो  खाएंगे नही तो भूखे पेट ही सो जाएंगे’ अशी अवस्था असल्यामुळे या 

लोकांच्या वाट्याला हलाखीचे दिवस आलेले दिसत आहेत.

शिरपूर तालुक्यात प्रत्येक गावात दोन लग्न मंडप व कॅटरिंग या प्रमाणे बँड पार्टी आहेत त्यांचा महत्वाचा सीजन म्हणजे मार्च ,एप्रिल आणि मे महिना.बँड मालकांनी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने वाजवणाऱ्या कारागिरांना लाखो रुपये डिसेंबर महिन्यातच देऊन टाकले आहेत त्यांनी सीजन मध्ये साथ सोडू नये म्हणून पण यंदा कोरोनामुळे काही कमवता तर आले नाही पण बँड चालकांचे लाखो रुपयांचे नुकसान मात्र झाले आहे. 

एप्रिल महिन्यात लॉक डाऊन संपले तर ठीक आहे.रोजंदारीची कामे करणाऱ्या शेकडो हजारो काम करणाऱ्या कामगारांवर रोजी आणि रोटी बंद झाल्याची आफत ओढवलेली दिसत आहे.एकूणच काय तर हतावरची पोट असलेल्या लोकांच्या पोटावरच कोरोनाने आघात करायला आता सुरवात केली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध