Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ३१ मार्च, २०२०

ब्रेकिंग न्युज.चिंता वाढविणारी बातमी



बुलडाणा:प्रतिनिधी बुलडाणा येथील 'त्या'  मृतकाच्या परिवरातीलच आणखी 2 कोरोना पाॅझिटिव्ह असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित यांनी दिली आहे.

बुलढाणा येथे रविवार 28 मार्च रोजी मिर्झा नगर परिसरातील एका 46 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता, त्याच्या घशातील स्वॅबचे नमुना नागपूर येथील मेडिकल कॉलेजच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आला होता. तो पॉझिटीव्ह आल्यानंतर एकच खळबळ उडाली. 

त्यानंतर आरोग्य यंत्रणा व जिल्हा प्रशासनाने त्या कुटुंबासह परिसरातील 60 व्यक्तींना तपासणीसाठी सामान्य रुग्णालयात आणले. पहिल्या दिवशी रात्री 60 पैकी 24 तर दुसर्‍या दिवशी सकाळी पुन्हा आठ नमुने तपासणीसाठी नागपूरला पाठविण्यात आले, त्या एकूण 32 नमुन्यांपैकी सोमवार 30 मार्च रोजी सायंकाळी 20 नमुन्यांचे रिपोर्ट  निगेटिव्ह आले होते.. तशी ही दिलासादायक बातमी असतानाच आज मंगळवार 31 मार्च रोजी सकाळी पुन्हा त्यातली 3 नमुन्यांचे रिपोर्ट प्राप्त झाले व त्यातील 2 पॉझिटिव आले. 

अजुन 9 नमुन्यांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. जे कोरोना पॉझिटिव्ह आले, त्यातील एक 65 वर्षीय इसम व एक 12 वर्षीय मुलगी असल्याचे समजते.

तेव्हा बुलडाणेकर व जिल्हावासियांनो,
आता तरी काळजी घ्या व कृपया घराबाहेर पडू नका..

हे तरूण गर्जना न्युज ई पेपर च्या वतीने सर्वांना विनम्र आवाहन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध