Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ३१ मार्च, २०२०

कोरोना,जग आणि भारत



मित्रांनो अवघ्या जगात कोरोना या महामारीने थैमान घातले आहे काही देशात मृत्यूचा आकडा दहा हजारांवर गेल्याचे वृत्त असतांना यातुलनेत लोकसंख्येच्या दृष्टीने जगात दुसऱ्या क्रमांकावर असलेला आपला भारत देश सध्या तरी सुरक्षितच आहे असे म्हणायला हरकत नाही;

याला कारण आहे आपल्या देशाचे आणि सर्व राज्यांचे नेतृत्व ...कारण वेळीच लॉकडाउनचा निर्णय घेतला नसता तर आज आपल्या देशाचे चित्र काही वेगळेच असते त्यामुळे हा निर्णय घ्यायला आपल्या सरकारने उशीर केला नाही हे बरे झाले.

तसेच आपला देश जेव्हा सुरळीत चालू होता तेव्हा अपघाताने व इतर कारणाने मृत्यू होण्याचे प्रमाण हे दिवसाला चारशेहुन अधिक होते  हे प्रमाण कोरोना आजाराने मारणाऱ्यांपेक्षा खूप जास्त होते ते मात्र थांबले आहे ही पण एक दिलासादायक बातमी आहे

दुसरीकडे आपल्या देशात हा रोग आणखी हातपाय पसरू नये याकरिता आपल्या आरोग्ययंत्रणा तसेच डॉक्टर,नर्सेस व दवाखान्यातील इतर कर्मचारी हे अहोरात्र झटत आहेत तर कोणी घराच्या बाहेर पडू नये व संसर्ग होऊन या रोगाचा आणखी प्रसार होऊ नये याकरिता आपले पोलीस व इतर सुरक्षा यंत्रणा सुद्धा अहोरात्र आपले कर्तव्य बजावत आहेत;

कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारासाठी आर्थिक मदत देण्यासाठी हजारो हात सरसावले असून अनेक सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते व पोलीस रात्रंदिवस गरजु व उपाशी लोकांना खुप मदत करत आहेत असे असतांना काही लोक अजूनही याबद्दल गंभीर नसल्याचे चित्र काही ठिकाणी दिसत आहे हे मात्र खुप खेदाची बाब आहे काही असंवेदनशील नीच दर्जाचे व्यवसायिक लोक लॉकडाउन चा फायदा घेऊन जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढत्या दराने विकून आपली नीच प्रवृत्ती दाखवत आहेत असे आढळल्यास आपण त्वरित शासनाशी संपर्क करावा

मित्रांनो सध्या जरी हा आजार आपल्या देशात जास्त प्रमाणात नसला तरी आपण यातून बाहेर निघालेलो नाही कारण यावर अजून तरी औषध उपलब्ध झालेले नसल्याने आपल्या देशात जो पर्यंत एक जरी रुग्ण शिल्लक राहिला तरी आपण ही लढाई जिंकली असं समजता येणार नाही

कृपया कोणी अनावश्यकरित्या बाहेर पडू नका ,काही होत नाही दहा दिवस आपण एखादी गोष्ट कमी खाल्ली किंवा थोडं उपाशी राहिलो तर कारण जिवंत राहिलो तरच पोटभर जेवू ;

घरातील वयोवृद्ध,उच्चरक्तदाब, डायबेटीस च्या व्यक्ती आणि लहान मुले यांना अजिबात बाहेर पडू देऊ नका कारण त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने त्यांचेवर कोरोना विषाणूचा प्रभाव लवकर होतो

त्याच बरोबर आपण इतर सर्वांची काळजी घेत स्वतःची पण काळजी घ्या.
आपण सर्व मिळून सरकारला सहकार्य करूया आणि ही लढाई जिंकूया
     
अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्था शाखा शेगाव शहराध्यक्ष श्री उमेश सुरेश राव राजगुरे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध