Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ३१ मार्च, २०२०

परमहंस रामचंद्र महाराजांची वझेगाव यात्राही स्थगित



भाविकांनी घरिच पूजा करून दर्शन घ्यावे - आवाहन

शेगाव प्रतिनिधी येथून जवळच असलेल्या श्रीक्षेत्र वझेगाव येथील परमहंस श्री रामचंद्र महाराज संस्थान येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही 2 एप्रिल रोजी श्रीराम नवमीला भव्य यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते परंतु कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात लॉकडॉऊन असल्याने अध्यक्ष व विश्वस्तांकडून ही यात्रा स्थगित करण्यात आली असून भाविकांनी महाराजांच्या प्रतिमेची पूजा करून घरूनच दर्शन घ्यावे असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष व विश्वस्त यांच्याकडून करण्यात आले आहे.

श्रीराम नवमी ते हनुमान जयंती पर्यंत दरवर्षी परमहंस रामचंद्र महाराजांची यात्रा भरत असते यामध्ये दररोज धर्मिक कार्यक्रम पार पाडतात तर महाराजांची संपूर्ण गावातून मिरवणुक काढण्यात येते राज्याच्या कान कोपऱ्यातुन भाविक दर्शनासाठी येतात परंतु यंदा ही यात्रा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे स्थगित करण्यात आली आहे. 

तर संपूर्ण देश बंद आहे तरी काही भाविकांनी कोरोनाला रोखण्यासाठी घरीच थांबावे महाराजांची पूजा अर्चा, घरीच करावी व तेथूनच दर्शन घ्यावे असे आवाहन रामचंद्र महाराज संस्थांचे अध्यक्ष व विश्वास्त यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध