Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, २५ मार्च, २०२०

नगरदेवळ्यात किराणा दुकान दारांची साठमारी,अव्वाच्या सव्वा भाव लाऊन ग्राहकांची लुट


जळगाव प्रतिनिधी:तहसिलदार महोदय व पुरवठा अधिकारी सौ.यांना नम्र विनंती की महोदय सो. कोरोना व्हायरस या संक्रमनाच्या दक्षतेसाठी शासनाने संचारबंदी नियम लागू केला असून फक्त जिवनावश्यक वस्तूंचे व्यवहार ठराविक काळात सुरू आहेत.

नेमके याच स्थितीचा फायदा नगरदेवळ्यातील किराणा दुकानदार उचलत असून माल शिल्लक नाही,तिकडे भाव वाढले असे निमित्त दाखवुन प्रत्येक ग्राहकास संचारबंदीचे भुत दाखवूत लुटमार करीत आहे.८८ रू किलोचे तेल १३२०/१३०, ९०रू.किलोचे शेंगदाने ११०/१२५ अश्या प्रकारे सर्वच मालसामानात लुटमार सुरू असून तहसिलदार सौ.पाचोरा व अन्न व औषध प्रशासन अधिकारींनी तातडीने नगरदेवळा येथे भेट देऊन.किराणा दुकानंदारांवर कारवाई करावी सोबतच प्रत्येक दुकानावर भावफलक , मालाचा स्टाँक,याबाबत दररोज नोंदी ठेवण्याचे निर्देश द्यावेत.अन्या कोरोना निमित्तच्या संचारबंदीचा आदर करणार्या नागरीकांना लुटमारीचा तडखा सुरूच राहील व यात पिळलेला नागरीक संतप्तपणे आपला राग व्यक्त करण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

तरी महोदय तहसिलदार सो.पाचोरा व पुरवठा निरीक्षक सौ.यांनी तातडीने नगरदेवळा येथे भेट देऊन दुकानदारांना सुचित करावे हि.विनंती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध