Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ५ मार्च, २०२६
कसबे वणी परिसरातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी अटकेत
कसबे वणी, ता. दिंडोरी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी अटकेत
वणी पोलीस ठाणेस गुरनं ४३/२०२६ भा.न्या.सं. कलम ६४, ६५(१), ११५(२), ३५२, ३५१(२) (३), सह पॉक्सो कायदा २०१२ चे कलम ४,६,८,१०,१२ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयातील अल्पवयीन पिडीत मुलीवर आरोपी नामे दानिश शेख, रा. कसबे वणी, ता. दिंडोरी याने अत्याचार करून तिस वारंवार बदनामी करण्याची व घरातील सदस्यांना जिवे मारून टाकण्याची धमकी दिलेवरून वरील गुन्हा दाखल आहे. यातील आरोपी हा गुन्हा घडल्यापासून फरार झाला होता
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी कळवण विभाग किरणकुमार सुर्यवंशी यांनी सदर प्रकरणी तात्काळ दखल घेवुन यातील आरोपीतास अटक करणेसाठी दिलेल्या सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर, वणी पो.स्टे. च्या स.पो.नि गायत्री जाधव, अभोणा पो.स्टे. च्या स.पो.नि योगिता कोकाटे, वणी पो.स्टे. वे पो.उ.नि गणेश कुटे, पोलीस अंमलदार माधव साळी , धनंजय शिलावटे, प्रितम लोखंडे, निलेश सावकार, स.पो.उ.नि जाडर, म.पो.हवा मीरा गावीत, पोहवा क-हाड, पोकों चौरे, पोका आहेर, पोहवा हेमंत गिलबिले, पो.ना प्रदिप बहिरम, नितीन गांगुर्डे यांचे पथकाने कारवाई केली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा