Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ८ मार्च, २०२०
भोई समाज महिला मंच द्वारे महिला दिवस उत्साहात साजरा..!
शिरपूर:प्रतिनिधी:दैनंदिन जीवनात अगदी सहजतेने विविध भूमिका पार पाडत महिला समाजाच्या आधारस्तंभ बनल्या आहेत. कधी प्रेमळ कन्या, तर कधी वात्सल्यपूर्ण माता, तर कधी सक्षम सहचारिणी अशी विविध नाती अत्यंत कुशलतेने आणि कोमलतेने त्या निभावत आहेत
त्या अनुशंगाने शिरपूर भोई समाज आदर्श विकास मंडळ ,भोईसमाज प्रेरणा ग्रुप आणि भोईसमाज महिलामंच यांच्या च्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला मेळावा संपन्न झाला.
सदर कार्यक्रमात गंगाबाई मोरे ,सुशीला वाडीले, प्रमिलाबाई ढोले यांनी जेष्ठ मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन केले.समाजाने नवीन परंपरा अवलंबण्या बरोबर मुलींच्या शिक्षणाचे महत्व याची माहिती हेमलता वाडीले,महिलांचे स्वरक्षण करणारा कायदा याची माहिती सुरेखा वाडीले,सून सासू चे नाते कसे असावे हे भारती वाडीले यांनी दिली याच बरोबर ज्योती मोरे ,रेखा वाडीले यांनी महिलांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
त्याचबरोबर संगीत खुर्ची या मनोरंजनात्मक कार्यक्रम ही घेतला गेला.त्यात अर्चना वाडीले ,ज्योती मोरे विजयी झाल्या. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमलता वाडीले मॅडम यांनी केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्राप्त माहितीनुसार एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी शिंदखेडा तालुक्यातील दरणे व रोहाणे या दोन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या विषय...
-
नाशिक प्रतिनिधी : शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेला धुळे येथील प्रशांत वाडिले या...





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा