Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ५ मार्च, २०२०
Home
/
Unlabelled
/
अमळनेर तालुक्यातील संस्थाचालकाची चालतेय मनमानी विद्यार्थी पालकासह पत्रकाराविरुध्द केला गुन्हा दाखल
अमळनेर तालुक्यातील संस्थाचालकाची चालतेय मनमानी विद्यार्थी पालकासह पत्रकाराविरुध्द केला गुन्हा दाखल
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील चोपडाई कोंढावड येथील सदगरू पब्लिक इंग्लिश मीडियम स्कलमधील विद्यार्थ्यांना मारहाण केल्यानंतर एका विद्यार्थ्याने संस्थाचालकाविरुद्ध गुन्ह दाखल केल्यानंतर लगेच शाळेतील प्राचार्यांनी कांगावा करीत विद्यार्थी, त्याचे पालक, गटशिक्षणाधिकारी, ‘खबरीलाल’चे मख्यसंपादक जितेंद्र ठाकूर आणि अन्य तिन पत्रकारांवर दंगल, मारहाण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
तालुक्यातील चोपडाइ कोंढावड येथील सदगरू पब्लिक इंग्लिश मीडियम स्कूलमधील विद्यार्थी अभ्यास करीत असताना त्यांनी प्राचार्यांना शिविगाळ केल्याचा गैरसमज करून घेत त्यांनी हा प्रकार शाळेचे संस्थाचालक संजय व्यास यांना सांगितला.व्यास यांनी शाळेत येऊन थेट पाच विद्यार्थ्यांना स्टंमपने बदडून काढले होते. याप्रकरणी विद्यार्थी नयन अमोल पाटील याने अमळनेर पोलिस ठाण्यात संस्थाचालकांविरुद्ध फिर्याद देऊन गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर शाळेच्या प्राचार्यांनीही अमळनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की,२८फेब्रुवारी रोजी गेटवर शाळेतील विद्यार्थी नयन अमोल पाटील,अमोल भालेराव पाटील,नवाजोद्दीन शेख (दैनिक भास्कर पत्रकार), ”खबरीलाल” चे मुख्यसंपादक जितेंद्र ठाकूर, अमळनेर सेव्हनचे महेंद्र रामोशी, अमळनेरचे गटशिक्षणाधिकारी राजेंद्र महाजन यांच्यासह इतर सहा असे १२ जण आले.
त्यांनी गेटवाचमन बडगुजर यांना गेट उघडण्यास सांगितले. ते गेट उघडत नव्हते म्हणून शिविगाळ केली. त्यानंतर त्यांनी प्राचार्यांना ही माहिती दिली. त्यांनी गेट उघडण्यास भाग पाडून प्राचार्यांचा विनयंभग केला. याप्रकरणी प्राचार्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भादंवि कलम १४३, ४५२, १४७, १४८, २९४, ३५४, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुभाष महाजन करीत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
नंदुरबार प्रतिनिधी:- नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील गंगापूर येथील आदिवासी जमीन गैर-आदिवासी व्यक्तीला बेकायदेशीरपणे हस्तांतरित केल्य...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा