Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १३ जून, २०२६
Home
/
/
वणी गावात अवघ्या एका महिन्यातच गटार पाईपलाईन फुटली; निकृष्ट कामामुळे नागरिकांचा जीवाशी खेळ.
वणी गावात अवघ्या एका महिन्यातच गटार पाईपलाईन फुटली; निकृष्ट कामामुळे नागरिकांचा जीवाशी खेळ.
वणी येथील वॉर्ड क्रमांक ४ मध्ये अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या भागात करण्यात आलेल्या गटार पाईपलाईनचे काम पूर्ण होण्यापूर्वीच टाकलेले पाईप फुटले आहे , तोच गटारीचा मुख्य पाईप आणि चेंबर फुटल्याचे उघडकीस आले आहे. या निकृष्ट कामामुळे ग्रामपंचायतीचा कारभार आणि संबंधित ठेकेदाराच्या कामाच्या दर्जावर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
नेमका काय आहे प्रकार?
मिळालेल्या माहितीनुसार, वनी गावातील वॉर्ड क्रमांक ४ मधील मुख्य रस्त्यावर संताजी चौक राजीव गांधी बँकेसमोर नवीन गटार पाईपलाईनचे काम करण्यात आले होते. मात्र, हे काम इतक्या सुमार दर्जाचे झाले आहे की, अवघ्या काही दिवसांतच रस्त्याच्या मधोमध असलेले पाईप पूर्णपणे तुटली आहे. रस्त्यावर थेट मोठा खड्डा पडल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असूनअपघाताची मोठी भीती आहे
हा रस्ता वर्दळीचा असून येथून महिला, लहान मुले आणि दुचाकी वाहनांची सतत वर्दळ असते. उघड्या पडलेल्या या फुटलेल्या पाईप गटारीमुळे येथे मोठा अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. "निष्काळजीपणामुळे एखादा मोठा अनर्थ घडल्यास त्याला जबाबदार कोण?" असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत.
ग्रामपंचायतीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह?
शासकीय निधीतून होणाऱ्या या कामाच्या दर्जावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची असताना, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. ठेकेदाराने वापरलेले साहित्य अत्यंत निकृष्ठ दर्जाचे असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या कामात आर्थिक गैरव्यवहार झाला आहे का? अशी शंकाही आता उपस्थित केली जात आहे.
कडक कारवाईची मागणी; अन्यथा आंदोलनाचा इशारा.
अवघ्या एका महिन्यातच काम निकृष्ट ठरल्यामुळे या कामाचे शासकीय ऑडिट करून संबंधित ठेकेदारावर आणि याकडे दुर्लक्ष करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ कडक कारवाई व्हावी, अशी मागणी वॉर्डातील नागरिकांनी केली आहे. प्रशासनाने यावर त्वरित कारवाई करून नवीन दर्जेदार काम करून न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
प्रतिक्रिया :-
"या कामाच्या निकृष्ट दर्जाबाबत या पूर्वी तक्रारी आल्या आहेत. संबंधित कामाची पाहणी करून ठेकेदाराला दुरुस्तीचे आदेश देण्यात येतील, तसेच दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल." ग्रामपंचायत अधिकारी - संजय देशमुख वणी ग्रामपंचायत सचिवालय
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नरडाणा / शिंदखेडा प्रतिनिधी :- धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांवर नरडाणा पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ आरोपी व एक...
-
नरडाणा / शिंदखेडा प्रतिनिधी : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांवर नरडाणा पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ आरोपी व एका ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा