Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २९ एप्रिल, २०२०
Home
/
Unlabelled
/
लॉकडाउन मध्येही दारु विक्री सुसाट; शहरातील सर्व वाईन शॉप व बियर बारचे लॉकडाउन काळातील मद्यसाठे तपासण्याची गरज
लॉकडाउन मध्येही दारु विक्री सुसाट; शहरातील सर्व वाईन शॉप व बियर बारचे लॉकडाउन काळातील मद्यसाठे तपासण्याची गरज
जळगाव प्रतिनिधी:कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाउन आहे. अशा स्थितीत केवळ जीवनावश्यक वस्तू सेवा वगळता इतर सर्व व्यवहार ठप्प आहेत. यात वाईन शॉप, बार सर्व बंद असताना देखील दिवसभर दारू सर्वत्र मुबलक स्वरूपात उपलब्ध होत आहे. सर्व वाईन शॉप, बियर बार बंद असताना एवढ्या मुबलक प्रमाणात दारु येते कुठून? असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे.
याबाबत सविस्तर असे की, कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वोतपरी प्रयत्न करत आहे. तसेच पोलीस कर्मचारी रस्त्यावर कर्तव्य बजावत आहे. याचाच फायदा गल्ली बोळात अवैध दारू विक्रेते घेत असून या अवैध दारू विक्रीला उधाण आले आहे. भाजीपाला मिळणे कठीण परंतु दारू मात्र सहज उपलब्ध अशी स्थिती आहे. कालच जळगांव तालुका पोलिसांनी मोठया प्रमाणात अवैध दारु जप्त केली असून या लॉकडाउन काळात शहरातील किरकोळ अवैध दारु विक्रेत्यांकडे दारु आली कुठून? असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. तर लॉकडाउनचा फायदा घेत चढ्या दराने देशी, विदेशी दारू, बिअर, व गावठी दारू विक्री सुरू असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहे. अवैध दारू विक्रीतून कोरोना विषाणू प्रसाराचा संभाव्य धोका लक्षात घेणे गरजेचे आहे. तर जळगांव शहरातील सर्व वाईन शॉप व बियर बार यांचा लॉकडाऊन काळातील मद्य साठे राज्य उत्पादन विभागाने तपासल्यास नक्कीच याकाळातले दोषी आढळून येतील. राज्य उत्पादन विभागाकडून अशी कडक तपासणी करण्यात यावी, अशी जनमानसात चर्चा आहे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नरडाणा / शिंदखेडा प्रतिनिधी :- धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांवर नरडाणा पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ आरोपी व एक...
-
संदीप अवधूत :- शासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांची संपूर्ण शारीरिक व कागदपत्रीय पडताळणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यातील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा