Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १० एप्रिल, २०२०

कोरोना ग्रस्तांसाठी 40 बेडच स्वतंत्र आयसोलेशन कक्ष



खामगाव बुलडाणा: कोरोना आजाराचा मुकाबला करण्यासाठी प्रशासनाने विविध उपायोजना हाती घेतले आहेत . रुग्णांची संख्या वाढली तर त्यांच्यावर उपचारासाठी आवश्यक यंत्रणा तयार करण्यात येत आहे . याचाच एक भाग म्हणून खामगावमध्ये कोरोनाग्रस्तावर उपचार करण्यासाठी स्वतंत्र आयसोलेशन कक्ष सुरू करण्यात आले असून आज जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी आयसोलेशन वार्डची पाहणी केली . 

कोरोणा विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून बुलढाणा जिल्ह्यात आतापर्यंत १२ रुग्ण आढळून आले आहेत . कोरोनाची लक्षण असलेल्या तसेच संशयीत रुग्णांसाठी बुलडाणा येथील महिला रुग्णालयात १०० बेडचं सर्व सुविधायुक्त रुग्णालय तयार करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी दिली होती , त्यांनंतर आता खामगाव सामान्य रुग्णालयात एका स्वतंत्र इमारतीत कोरोना ग्रस्तांसाठी ४० बेडचं आयसोलेशन वार्ड तयार करण्यात आला आहे . 

हा विभाग पुर्णत स्वतंत्र राहणार असून प्रवेशद्वार सुध्दा वेगळे राहील . आवश्यक सर्व सुविधा याठिकाणी राहणार आहेत . कोरोना रुग्ण वाढत असल्याने खबरदारी म्हणून ही उपाययोजना करण्यात आली आहे . आज जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी आज या विभागाची पाहणी करून समाधान व्यक्त केले . 

यावेळी उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण , तहसीलदार शितल रसाळ , मुख्याधिकारी धनंजय बोरीकर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सुनील थोटांगे यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते

मॅडम म्हणाल्या ' बेस्ट ऑफ लक खामगाव सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन कक्षास जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी भेट दिली . यावेळी सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात आवश्यक असलेल्या सोयी सुविधा बाबत चर्चा केली . निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ . निलेश टापरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक साहित्य व इतर माहिती दिली . हे साहित्य तातडीने पुरविण्याबाबतजिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना निर्देश देऊन आरोग्य विभागाच्या टीमला ' बेस्ट ऑफ लक म्हणत कोरोनाशी दोन हात करण्याबाबत प्रेरणा दिली . खामगाव सामान्य रुग्णालयात ४० बेड असलेला स्वतंत्र आयसोलेशन कक्ष सुरू करण्यात आलेला आहे . या कक्षात आवश्यक असलेल्या सर्व सोयीसुविधा आहेत . जिल्हाधिकारी सुमन चंद्रा मॅडम यांनी या कक्षाची पाहणी करून योग्य ते निर्देश दिले . 

खामगाव येथे सध्या ३व्हेंटिलेटर उपलब्ध असून आणखी सात व्हेंटिलेटर व आवश्यक साहित्याची पुर्तता करण्यात येणार आहे .


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध