Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १० एप्रिल, २०२०

कळमोदा येथे कोरोना संदर्भात जनजागृती



रावेर तालुक्यातील:कळमोदा येथे कोरोनासाठी नेमलेल्या समिती सोबत सरपंच, ग्रामसेवक पोलीस पाटील तलाटी, कोतवाल, ग्रामपंचायत सदस्य, /कर्मचारी, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक,आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविका, मदतनीस,यांनी बाहेर गावाहून आलेल्या लोकांना थंडी ताप खोकला याबाबत विचारणा केली असता त्यांना जवळ च्या प्रधामिक आरोग्य केंद्र खिरोदा येथे तपासणी करून घ्यावी अशी सूचना दिल्या. 

तसेच इतर लोकांना कामाशिवाय घराबाहेर निघू नका अशी जनजागृती  केली आणि गावात करोना आजरासंदर्भात पुन्हा पुन्हा माहिती दर  दिवशी समितीची मीटिंग संपल्यानंतर दिली जाते  तसेच ठिकाणी ठिकाणी जे लोक एकत्रित बसतात त्याठिकाणी काळा अाईल  टाकले जात आहे तसेच खबरदारी म्हणून तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधणे व घराच्या बाहेर विनाकारण निघू नये. तसेच कोठेही गर्दी करू नये व सामाजिक अंतर पाळावे, असे आवाहन समितीने केले.

पोलीस निरीक्षक मा.वाघ साहेब  यांनी कळमोदा गावाला भेट देत ग्रामस्थांना कोरोना आजाराबद्दल माहिती देत जनजागृती केली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध