Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १६ एप्रिल, २०२०
Home
/
Unlabelled
/
राज्यातील वजनदार कॅबिनेट मंत्री महोदयांसोबत श्री प्रकाश लोणारे यांची बैठक संपन्न... श्री पंकजबावणे
राज्यातील वजनदार कॅबिनेट मंत्री महोदयांसोबत श्री प्रकाश लोणारे यांची बैठक संपन्न... श्री पंकजबावणे
नागपुर:प्रतिनिधी राज्यातील मच्छीमार तलाव ठेका धोरण/त्यातील किरकोळ बाबीवर तसेच गोड्यापाण्यातील मच्छीमारांच्या सद्यस्थितीत असलेल्या मांगण्याबाबत ही बैठक झाली असल्याचे कळते यावेळी मजूर सहकारी संस्थाचे पदाधिकारी ही उपस्थित होते.
मच्छीमार तलाव ठेका धोरणात महत्त्वाचे सुझाव देऊन एक स्थिर शासन निर्णय निर्गमित करण्यास सहयोग करणारे शासन नियुक्त समितीचे सदस्य, महाराष्ट्र राज्य मत्स्यफेडचे संचालक तसेच विदर्भ मत्स्यफेडचे अध्यक्ष श्री प्रकाश लोणारे यांना चर्चे करिता बोलाविले होते श्री लोणारे यांनी काही दिवसांपूर्वीच निवेदन/वर्तमानपत्र द्वारे ₹ २०० कोटी रुपयांच्या पेकेजची मांगणी शासनाने मत्स्यबीज संचयन करावे व २०२० या चालू हंगामातील तलावठेका रक्कम माफ करावी या मांगण्या महाराष्ट्र सरकार समोर मांडण्यासाठी तसेच मुख्यमंत्री मा उद्धव ठाकरे साहेब यांच्या समोर मांडून पुढील काळात मंजुरी करिता प्रयत्न केले जाईल असे बैठकीत ठरले...
आपसातील हेवेदावे विसरून मत्स्यव्यवसाय सहकारी चळवळ अधिक मजबूत करावी यावेळी चर्चा झाली. महाराष्ट्र राज्य मत्स्योद्योग विकास महामंडळचे अंतर्गत येणारे तलावांचे ठेक्याची रक्कम कशी कमी करता येईल याचा फार्मूला/शक्कल काय राहील हेही सुचविन्याचे निर्देश दिले. मत्स्यव्यवसायात मोठ्या प्रमाणावर प्रोजेक्टची आखणी करून त्यातून सुशिक्षित बेरोजगार मच्छीमार समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध होईल अशी रचना करण्याच्या सूचना मंत्री महोदय यांनी लोणारे यांना दिल्या याकामी शासन म्हणून मी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल असे सूतोवात ही केले.
वर्तमान महामारी, लॉकडाउन
कोविड -19 (COVID-19) व्हाइरसच्या प्रभाव काळात मासेमारी क्षेत्रात निर्माण झालेल्या समस्यांवर ही चर्चा दि १६/४/२० दुपारी संपन्न झाल्याची माहिती पंकजबावने यांनी दिली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा