Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १६ एप्रिल, २०२०

गंगामाई फार्मसी महाविद्यालयात 'लर्न फ्रॉम होम'




कोरोना संसर्ग जन्य विषाणूची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन सुरू असल्याने सर्व फार्मसी महाविद्यालयाना सुटी जाहीर करण्यात आलेली आहे. 


या पार्शवभूमीवर विद्यार्थ्यांचं शेक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी गंगामाई बी फार्मसी महाविद्यालयाने घरी बसून अभ्यास करावा, ही संकल्पना प्राचार्य डॉ.अनिलकुमार टाटीया यांच्या मार्गद्शनाखाली राबवली जात आहे. गंगामाई बी फार्मसी महाविद्यालयात प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष, तृतीय वर्ष , चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांचे सोशियल मीडियावर ग्रुप आहेत. 
त्या प्रत्येक ग्रुप वर संबधित विषय प्राध्यापक विद्यार्थ्यांना महाविद्यालयांशी संबंधित व विद्यापीठाशी संबंधित माहिती देत आहेत.प्रत्येक ग्रुप वर आता नियमित प्राध्यापक आपापल्या विषयाच्या नोट्स ,व्हिडिओ, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन द्वारे सखोल  ज्ञान घरी बसल्या विद्यार्थ्यांना देत आहेत. 

दररोज त्यांना सराव प्रश्न देऊन मागील अभ्यासाशी उजळणी सुद्धा घेतली जात आहे.गृहपाठ हा गुगल फॉर्म वरती घरी बसल्या मागवला जातो. सदर उपक्रमास विद्यार्थ्या चा उत्तम  प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थ्यांचा वेळ सत्कारणी लागत असल्यामुळे पालक व विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

घरी बसून अभ्यास या उपक्रम राबवत असलेल्या गंगामाई बी फार्मसी महाविद्यालया चे प्राचार्य डॉ.अनिलकुमार टाटीया  उपप्राचार्य डॉ.सुफियान अहमद व सर्व प्राध्यापकांचे गंगामाई संस्थेचे सचिव बाळासाहेब मनोहर भदाने ,उपाध्यक्ष माई सो ज्ञानज्योती भदाने, अध्यक्ष राम भदाने यांनी कौतुक केले आहे . 

लॉकदाऊन च काळात  विद्यार्थ्यांना मोबाईल अॅप द्वारे शिकवून विद्यार्थ्यांमधील शिक्षणाची गोडी टिकून असून विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.

1 टिप्पणी:

प्रसिद्ध