Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २१ एप्रिल, २०२०

पतीच्या निधनानंतर घर सोडावे लागलेल्या कुटुंबाची जबाबदारी आरंभने स्वीकारली



नळदुर्ग प्रतिनिधी करोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये भीती आहे. सध्याच्या परिस्थितीत अनेक दानशूर मदत करत असताना काहीजण माणुसकी विसरले की काय असा प्रश्न पडतो. पुण्याहून आल्यामुळे करोनाचा संशय व्यक्त करून घराबाहेर जाण्यास भाग पाडल्याची उमरगा येथील घटना उघडकीस आली आहे . 

राज्यासह देशात कोरोनामुळे लॉकडाउन असल्याने पुणे येथे मजुरी करून उपजीविका करणारे मूळचे उमरगा येथील कुटुंबाची उपासमार होत होती त्यामुळे गावी परतण्याचा निर्णय घेतला. पण लॉकडाउन असल्याने प्रवासाचे साधन उपलब्ध नव्हते यामुळे पती, तीन छोटी मुले यांच्यासह स्वतः पायपीट करीत पुणे,नळदुर्ग ते उमरगा असा शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करून पती उमरगा येथे पोहचला व ती महिला नळदुर्ग येथे आपल्या माहेरी थांबली पण दुसऱ्याच दिवशी नियतीने घाला घातला अन पतीची तब्येत खालावल्याचा निरोप उमरगा येथून आला त्यामुळे आल्यापावली उमरग्याच्या दिशेने गेली पण पतीचे निधन झाले अंत्यविधी पार पडला, कोरोनाच्या संशय घेऊन शेजारी काहीजण वाद घातले ते आम्हाला सहन होत नव्हते यामुळे पर्यायाने आम्हाला घर सोडुन नळदुर्ग येथे आपल्या आई कडे येऊन रहावे लागले असे या महिलेने सांगितले. 
     
वर्तमानपत्रातील बातमीमुळे या कुटुंबाची माहिती व घडलेला प्रकार कळताच नळदुर्ग येथील आरंभ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने लॉकडाउन संपेपर्यंत या कुटुंबाची जबाबदारी घेत संस्थेच्या वतीने डॉ. जितेंद्र पाटील यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी केली व 15 पुरेल इतके किराणा, भाजी, फळे, मास्क, सॅनिटायझर ई जीवनावश्यक वस्तू जेष्ठ पत्रकार विलास येडगे, संस्थेचे अध्यक्ष राहुल हजारे, पप्पू पाटील यांच्या हस्ते देण्यात आले व नागरिकांनी सजग होऊन कुठल्याही अफवा वर विश्वास न ठेवता या महिलेसोबत जो प्रकार घडला तसा प्रकार पुन्हा घडू नये याची काळजी घ्यावी, याउलट कोणी अडचणीत असेल तर त्यांना माणुसकीच्या नात्याने शक्य ती मदत करावी असे आवाहन संस्थेच्या वतीने सचिव श्रमिक पोतदार यांनी केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष राहुल हजारे, उपाध्यक्ष विशाल डुकरे, सचिव श्रमिक पोतदार, प्रसिद्धी प्रमुख आयुब शेख, सोशल मीडिया प्रमुख सुरज आवटे,मयूर महाबोले आदी उपस्थित होते


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध