Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २१ एप्रिल, २०२०
शिकार व वणवा रोखण्यासाठी जंगलांमध्ये पायी गस्त
चोपडा तालुका सञासेन:-कोरोना या तीव्र संसर्गजन्य विषाणूला रोखण्यासाठी देशभर लॉकडाउन करण्यात आला असून,याचा गैरफायदा वन तस्करांकडून घेण्याची शक्यता असल्याने वन विभागाच्या जंगलात लागणारे वणवे तसेच शिकार रोखण्यासाठी आता वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लॉकडाउनच्या काळात जंगलात पायी गस्त घालणे अनिवार्य केले आहे .
व्याघ्र प्रकल्प,प्रादेशिक वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत . प्रत्येक जिल्ह्यातील वन विभागाच्या राखीव जंगलामध्ये आग लावण्याचे षडयंत्र वन तस्करांकडून आखण्यात येते.तसेच जंगलातील वृक्षांची अवैध कत्तल आणि त्यानंतर याच जंगलामधून लाकडांची अवैधरीत्या वाहतूक करण्याचा धोका एप्रिल आणि मे महिन्यात अधिक आहे. त्यामुळे राज्याचे अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक यांनी राज्यातील प्रादेशिक वन विभाग , वन्यजीव विभाग आणि व्याघ्र प्रकल्पांतर्गत येत असलेल्या जंगलामध्ये कर्मचा यांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून पायी गस्त घालणे अनिवार्य करण्यात आले आहे.
लॉकडाउनच्या पृष्ठभूमीवर अधिकारी व कर्मचा यांना अधिक सजग राहण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत.वणवा नियंत्रणासाठी कर्मचा यांना पायी गस्त घालताना सोसल डिस्टन्सिंगचे पालन करणे महत्त्वाचे आहे . यासोबतच मास्क किंवार रूमाल वापरणेही गरजेचे
असून,सॅनिटायझरही वारंवार वापरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
वणवा तसेच शिकार रोखण्यासाठी वन विभागाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत .
कार्यालयीन कर्मचारी कमी करण्यात आले असले तरी जंगलात मात्र पूर्ण बंदोबस्त लावण्यात आलेला आहे . तसेच लॉकडाउन झाल्यापासून वनसेवक व कर्मचारी पायी गस्त घालतांना दिसून येत आहेत.अशा प्रकारच्या सूचना त्यांना करण्यात आलेल्या होत्या त्याचे परिपूर्ण पालन करतांना दिसुन येत आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा