Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २१ एप्रिल, २०२०
Home
/
Unlabelled
/
तालुक्यात गावोगावी सायंकाळी दारूवाल्यांच्या घरी गर्दी, बीडीओंचा दारूवाल्यांना इशारा...पण पोलीस...
तालुक्यात गावोगावी सायंकाळी दारूवाल्यांच्या घरी गर्दी, बीडीओंचा दारूवाल्यांना इशारा...पण पोलीस...
पंकज पाटील,उपसंपादक,तरुण
गर्जना : अमळनेर तालुक्यात कुणी संडासचा
डब्बा घेवून जाताना दिसला तर लोकांना साहजिकच शोले पिक्चरच्या त्या डायलॉगची आठवण
येते...."बच्चा सो जा नही तो गब्बर सिंग आ
जायेगा" ...गावांत संडासचा डबा घेवून जाणाऱ्याला लोक त्या डायलॉगची आठवण करून
देतात...."बच्चा संडासचा वापर कर रस्त्यावर बसलास तर बीडीओ (वायाळ) पोलीस
स्टेशनमध्ये घेवून जातील"
बीडीओ
यांच्या धडाकेबाज
कारवाईमुळे संपूर्ण अमळनेर तालुक्यात उघड्यावर शौचालयास
बसायचे प्रमाण कमी
झाले. आज तोच परिणाम कोविड -१९ च्या पायबंद करतांना दिसून येत आहे.
बीडीओ साहेबांची गाडी गावांत येताच कमालीची शांतता प्रस्थापित होत आहे. त्याचबरोबर
ते गावठी
दारूविक्री करणाऱ्यावर देखील कारवाई करत आहेत. एकप्रकारे तालुक्यातील गावं व्यसन
मुक्तीच्या मार्गावर लागली आहेत.
कोविड -१९
च्या पायबंद करत
असताना एका निशाण्यात बीडीओ दारूबंदी , हागणदारी
मुक्त गावे आणि संचारबंदी करत
कार्य करत आहेत. जळगांव जिल्ह्यातील आणि
महाराष्ट्रातील इतर गटविकास अधिकारी यांनी देखील त्यांचा आदर्श घेणे गरजेचे आहे.
संचारबंदीच्या
काळात वायाळ हे
कोवीड १९ साठी काम करत असले, तरी यापूर्वी त्यांनी कर्तव्यदक्ष
राहून स्वच्छता मोहिमेत हागणदारीमुक्तीसाठी जे काम केलं आहे,
त्याची पावती आजही
त्यांना मिळतेय आणि संचारबंदीच्या काळातही लोक वायाळ येत आहेत,
असं ऐकलं तरी
डब्बा बाहेर घेऊन संडासला जायचं नाही हे पाळतायत. एवढंच नाही डब्बा जागेवर सोडूनच
पळ काढत आहेत.
संचारबंदी
काळात सर्वात
जास्त गर्दी ही खेड्यांमध्ये दारूवाल्यांच्या घरी दिसून येत आहे. त्यामुळे वायाळ
यांनी थेट दारूवाल्यांच्या घरी जाऊन तंबी देण्यास सुरूवात केली आहे. हे काम
वास्तविक पाहिलं तर तालुका पोलिसांचं आहे.
पण पोलीस खातं
अजूनही
दारूवाल्यांना घरी जावून तंबी का देत नाही ? याचा 'अर्थ' अजून लोकांना समजलेला नाही असं नाही,
निदान पहिल्या 'हप्त्यात'
नाही,
माफ करा पहिल्या
आठवड्यात नाही "दुसऱ्या" आठवड्यात तरी हे काम पोलिसांनी करावे,
असं नागरिकांचं
म्हणणं आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा