Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ७ एप्रिल, २०२०

कोरोनाला घाबरू नका स्वच्छता पाळा व दक्षता घ्या - ग्रामपंचायत भोनगांव

 

शेगांव(प्रतिनिधी) संपूर्ण जगाला वेठीस धरलेल्या कोरोना विषाणू संसर्गामुळे होणाऱ्या आजारामुळे भारत देशात आपले पाळेमुळे रोवण्यास सुरुवात केले आहे . या विषाणूचे समूळ उच्चाटन करण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे असल्याचे मत भोनगांव सरपंच यांनी यावेळी नागरिकांना सांगितल, पुढे नागरिकांना सांगताना  ते म्हणाले की , विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी कोणीही घरातून बाहेर पडू नये . 

तसेच घरा बाहेरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने हात स्वच्छ धुऊनच इतर वस्तूंना स्पर्श करण्यासाठीचे आव्हान केले असून या विषाणूला घाबरून जाण्याची गरज नाही . फक्त सुरक्षित व स्वच्छता पाळणे गरजेचे आहे . 

कोणी व्यक्ती याप्रकारे लक्षणे आढळून आल्यास त्यांना तात्काळ रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सल्ल्यानुसार उपचार सुरु करावे , असे आवाहन यावेळी भोनगांव कोरोना संचारबंदी निगराणी समिती यांनी केले आहे .

याप्रसंगी भोनगाव ग्रामपंचायत कोरोना निगराणी समिती स्थापन केले .या समिती मध्ये सरपंच गजानन रमेश रताळे,ग्रामसेवक शामराव गजानन टापरे,तलाठी मो.शेख,कृषिसहक भाउसाहेब दगडखैर,पोलीस पाटील सौ ज्योती श्रीकृष्ण भारसाकळे,तंटामुक्ती अध्यक्ष पुर्णाजी शालीग्राम भारसाकळे ,अंगणवाडी सेविका सौ माधुरी रामा गवई ,सौ सुनिता सारंगधर खारोडे,सौ कल्पना शंकर डोंगे,आशा वर्कर सौ रंजना संतोष मोरखडे ,सौ संगिता गजानन शेळके ,ग्रा.पं. सदस्य सौ कुसुमताई त्रंबक शेळके ,प्रभाकर शंकर पहुरकर ,सौ ललीता प्रविण कोल्हे, सौ अनिता मनोहर ढोके,सौ उषा नंदकिशोर भारसाकळे,रमेश शामा दाभाडे,प्रकाश शालीग्राम भारसाकळे, कु. दिपाली संतोष मोरखडे, रमेश इष्णाजी आप्तुरकार ,ग्रा.पं.शिपाइ वैभव विजय जोशी यांची उपस्थिती होती.

22 मार्च जनता कर्फ्यु लागू केल्यामुळे सर्व नागरिकांनी आपल्या घरातच थांबून कर्फ्यु 100 % करून संपूर्ण देशाचे आरोग्य जपण्यासाठी व करोणा विषाणू हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करावे ,असे आवाहन समिती ने केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध