Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २८ एप्रिल, २०२०
Home
/
Unlabelled
/
मच्छीमार बांधवांनी, मच्छीविक्रीच्या व्यवसातुन पुढे यावे... श्री नामदेवराव तिकोणे
मच्छीमार बांधवांनी, मच्छीविक्रीच्या व्यवसातुन पुढे यावे... श्री नामदेवराव तिकोणे
पुणे/कोल्हापूर:समजामध्ये सर्वजनच बुध्दीमान आहेत असे मी तरी समजतो. फक्त योग्यवेळी योग्य ठिकाणी बुध्दीचा वापर करून घेण्याची कला अंगात असली पाहिजे. सर्व प्रथम मला काय करायचे आहे? हे दहा वेळा विचार करून एकदाच ठरवा व मनात असे ठरवा की, हा व्यवसाय मी नक्कीच करू शकतो मग कोणीही कीतीही तुम्हाला सांगितले तरी त्याचे ऐंकू नका फक्त आपणास व्यवसाय करण्याचा आहे इतकेच मनात ठेवा. बाकी वाईट विचार मनात आनू नका आणि प्रत्येक वेळी आपण सरकारी मदत व समाजातील दानशूर लोकांच्याकडून मदतीची अपेक्षा तरी ठेऊ नका. व्यवसाय करायचाच म्हणल्यानंतर स्वतःचे हिंम्मतवर करा जिथं गरज पडेल तिथे योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या. व्यवसाय करताना लगेच मोठे होण्याची स्वप्ने तरी पाहू नका.
व्यवसाय करताना मला कोण काय म्हणेल का? याचा विचार करू नका किंवा लाजू ही नका.
लोक आपण काही नाही केलं तरीही नावे ठेवतात चांगल्या रस्त्यावर काही ठिकाणी गतिरोधक हे आपल्याला असताना दिसतात आणि ज्याला कोणाला मासेविक्रीचा व्यवसाय करायचा असेल तर त्याला मच्छीमाक्रेटमध्ये उधारी वरती मच्छी ही प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात मिळते. फक्त विक्री झालेनंतर सर्व प्रथम व्यापा-याच्या मालाची मुद्दल बाजूला काढा व बाकी राहिलेली रक्कम हा माझा फायदा आहे म्हणून तो खर्च करा पण तोही आपल्या कुटुंबात जन्मलेल्या मुलीमुलं, आईवडील, सहचारिणी यांच्यासह सामाजिक जाणिवेतून केलेल्या कार्यावर... व्यवसाय करताना जर तुम्ही व्यापाराचे पैसे ज्यात्यावेळी भागवल्यास तुम्हाला कोणताही व्यापारी माल हा नाही म्हणणार नाही व तुमच्यामागे व्यापारी हे माझा माल ध्या म्हणतील. माझा माल घे तुला दर कमी लावतो म्हणून ही म्हणतील... आज कोणताही धंदा तुम्ही प्रामाणिकपणे केल्यास आपल्याला कोणत्याही बँकेचे कर्ज मिळेल व इतर लोकांच्या पुढे हात पसरायला लागनार नाहीत तसेच आपले बरेचसे भोई बांधव मासे मारतात व व्यापार्याला नेहून घालतात तोच माल आपण विक्री केल्यास फायद्यामध्ये १००%ज्यादा फायदा मिळतो.
ज्यादा फायदा म्हणजे ज्यादा प्रगती. तेव्हा भोईबांधवानो, मच्छी विक्रीच्या व्यवसायात या व्यवसायामध्येच ज्यादा फायदा आहे. मी कोणी लेखक वगैरे नाही परंतु मला जे विचार कृतीतून सुचले ते आपल्या समोर मांडत आहे म्हणजे मी यामध्ये माझे व्यवसाय करताना आलेले अनुभव आपल्या समोर मांडण्याचा छोटासा प्रामाणिक प्रयत्न करत आहे. जय भोईराज, जय मच्छीमार.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
आरोपीची पब्लिकने केली यथेच्छ धुलाई अमळनेर: तालुक्यातील एकलहरे येथे कामानिमित्त आलेल्या एका मजुराने अल्पवयीन मुलीची छेड काढल्याने पब्लिक...
-
केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची घोषणा पंतप्रधान आवास योजनेंतर्गत (पीएमएवाय) महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील एकही लाभार्थी बेघर रा...
-
मुलांचा तापी नदीत बुडून मृत्यू अमळनेर: तालुक्यातील निम येथे तापी नदीत पोहायला गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्...
-
साक्री प्रतिनिधी:- साक्री, दि. 6 मे 2025 (सोमवार) साक्री तालुक्यातील तालुका फळ रोपवाटिका, साक्री येथे तालुका कृषी अधिकारी,साक्री कार्यालयाने...
-
खुनाचा गुन्हा दाखल ,शोधासाठी पोलीस पथक रवाना अमळनेर : तालुक्यातील पातोंडा येथील विद्युत ठेकेदाराच्या भावाला लोखंडी पाईप आणि लोखंडी पहार ने झ...
-
निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरण व नारपार नदीजोड प्रकल्पासाठी दिल्ली येथे जलशक्ती मंत्रालयात झाली यशस्वी बैठक ! अमळनेर-उत्तर महाराष्ट्रातील सि...
-
अमळनेर : बेकायदेशीर गावठी पिस्टल बाळगणाऱ्या पैलाड येथील शिवाजी नगर भागातल्या एका तरुणाला पोलिसांनी अटक करून त्याच्या जवळील २० हजार ५०० रुपय...
-
आतापर्यंतची जिल्ह्यातील या खरीप हंगामातील सलग 4थी कारवाई यामुळे अनाधिकृतरित्या बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे मा. सुनील बोरक...
-
दिनांक 8 जून 2025 रोजी तालुका कृषी अधिकारी कार्यालय, साक्री यांच्या कार्यालया मार्फत खरीप हंगामपूर्व ग्रामस्तरीय बैठक मौजे शेणपूर, तालुका सा...
-
अमळनेर प्रतिनिधी : मुडी, बोदर्डे, कळंबू रस्त्याच्या कडेला असलेले काटेरी झुडुपे प्रवाश्याना त्रासदायक ठरत असून किरकोळ अपघातांना निमंत्रण देत ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा