Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २८ एप्रिल, २०२०
Home
/
Unlabelled
/
नगाव येथील गंगामाई औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्रा. कुंदन देवरे यांचा डिप्रेशनवरील लेख WJPPS मध्ये प्रसिद्ध होणार.
नगाव येथील गंगामाई औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्रा. कुंदन देवरे यांचा डिप्रेशनवरील लेख WJPPS मध्ये प्रसिद्ध होणार.
धुळे प्रतिनिधी तालुक्यातील नगाव येथील नगाव एज्युकेशन सोसायटीच्या गंगामाई औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्रा. कुंदन हेमंत देवरे यांचा "डायग्नोसिस, प्रिवेंशन अँड कंट्रोल ऑफ डिप्रेशन " हा लेख वर्ल्ड जर्नल ऑफ फार्मसी अँड फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रसिद्ध होणार आहे त्याचा इम्पॅक्ट फॅक्टर हा 7.63 एवढा आहे.
डिप्रेशन अर्थात नैराश्य, उदासीनता. कोरोना ह्या आजाराने थैमान घातले आहे. त्यामुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे त्या मुळे बऱ्याचश्या लोकांमध्ये डिप्रेशन दिसून येत आहे, त्यावर मार्गदर्शन करणारा लेख ऑनलाईन पाठवला होता.
त्यात डिप्रेशन कस ओळखायचं व त्याचे निदान करून त्याला कस टाळायचं व त्याच्यावर कशापद्धतीने नियंत्रण मिळवायचे याबद्दल मारगदर्शन करण्यात आले आहे. हा लेख डिप्रेशनचा सामना करून मानसिक स्थिती चांगली ठेवायला मदत करेल. त्याच बरोबर डिप्रेशन वर नियंत्रण मिळवून आपले आपले आरोग्य चांगले ठेवून आपण कोरोनाच्या परिस्थिती चांगल्या प्रकारे लढा देऊ शकतो.
प्रा. कुंदन देवरे व प्रा. विनोद वाघ यांच्या या लेखाबद्दल त्यांचे संस्थेचे सचिव बाळासाहेब श्री. मनोहर भदाने, उपाध्यक्षा सौ. ज्ञानज्योती भदाने, अध्यक्ष श्री. रामदादा भदाने, प्राचार्य डॉ. अनिलकुमार टाटिया, उपप्राचार्य डॉ. सुफियान अहमद व सहकारी प्राध्यापकांनी कौतुक केले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा