Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २६ एप्रिल, २०२०
Home
/
Unlabelled
/
निंभोरा येथे रक्तदान शिबिर संपन्न,५०जणांनी केले रक्तदान. युवा रसिक मंडळातर्फे राबविला उपक्रम
निंभोरा येथे रक्तदान शिबिर संपन्न,५०जणांनी केले रक्तदान. युवा रसिक मंडळातर्फे राबविला उपक्रम
रावेर तालुक्यातील निंभोरा- येथील युवा रसिक मंडळातर्फे दि.२६ रोजी इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या माध्यमातून ५० जणांनी रक्तदान केले.यावेळी सरपंच डिगंबर चौधरी,डॉ एस डी चौधरी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती दुर्गादास पाटील,सोपान पाटील,नंदपाल दूध संस्थेचे चेअरमन सुधीर मोरे आदी उपस्थित होते.यावेळी सोशल डिस्टन्सचे काटेकोर पालन करीत रक्तदान शिबिर संपन्न झाले.याववेळी ४९ पुरुष व ०१ महिलेने रक्तदान केले.विशेष म्हणजे १८ वर्षाच्या खालील मुलांनीही यात सहभागी नोंदविण्याची आग्रह केला मात्र 18वर्षावरील व्यक्तीलाच रक्तदान करता येत असल्याने त्यांचा हिरमोड झाला.मात्र बाकी तरुणांनी उत्साहात रक्तदान केले.यावेळी इंडियन रेडक्रॉस सोसायटीतर्फे डॉ ए एम चौधरी,वीरेंद्र बिऱ्हाड़े,उमाकांत शिंपी,योगेश पाटील,अन्वर शेख यांसह निंभोरा येथील डॉ जयेश वाणी, डॉ डीएस झोपे आदींनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी धीरज भंगाळे,दुर्गादास पाटील,सुनील कोंडे,रवींद्र भोगे,गुणवंत भंगाळे,नंदपालचे चेअरमन सुधीर मोरे,सोपान पाटील,परमानंद शेलोडे,हर्षल ठाकरे,युगल राणे,राजीव भोगे आदींनी परिश्रम घेतले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा