Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १६ एप्रिल, २०२०
खिर्डी येथील तत्पर फाउंडेशन चे अध्यक्ष गुणवंत पाटील यांना जीवे मारण्याची धमकी.
निंभोरा पोलिसांत गुन्हा दाखल.
रावेर तालुक्यातील खिर्डी येथील तत्पर फाउंडेशन चे अध्यक्ष तसेच स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष गुणवंत पाटील यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. भ्रमणध्वनी ८९५९०७५५९२ या अनोळखी क्रमांकावरून एसएमएस द्वारे धमकी देण्यात आली आहे.यात ९० दिवसात त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.तसेच हा माथेफिरू आरोपी जळगाव येथील राजेंद्र आर पवार विंकटेश नगर जळगाव येथील आहे असे त्यांनी धमकीच्या एसएमएस मध्ये सांगितले आहे. या प्रकरणी फिर्यादी गुणवंत पाटील यांनी निंभोरा पोलिसांत गुन्हा नोंदविला आहे.काही दिवसांपूर्वी निंभोरा येथील प्रल्हाद बोंडे यांना ही ह्याच प्रकारे धमकी चा एसएमएस आला होता मात्र त्यांनी ही निंभोरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती.
ह्या माथेफिरूला पोलिसांनी लवकरात लवकर त्याचा तपास घेऊन त्याला अटक करण्यात यावा अशी मागणी फिर्यादीने केली आहे. या बाबत पुढील तपास निंभोरा पोलीस स्टेशन चे सपोनि महेश जानकर यांच्या मार्गदरणाखाली पो.को.अनवर तडवी करीत आहे.
प्रतिक्रिया:
एवढी गंभीर प्रकारचीं धमकी येणे याबाबत माझा, गावात,तालुक्यात, किंवा जिल्ह्यात असा कोणीही शत्रू नाही
परंतु माझेकडे काही संघटनात्मक पदे असल्याने माझा एखादा गुप्त शत्रू असल्यास व त्याला माझेपासून काही अडचण असल्यास त्यांनी मला प्रत्यक्ष भेटून सांगावे अशा पोकळ धमक्या देऊन माझे मनोबल कमी करण्याचं काम करू नये आणि मी पोकळ धमक्यांना अजिबात घाबरत नाही मला आलेल्या धमकीचा मी निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे व त्या गुन्हेगारास निंभोरा पोलीस स्टेशन स. पो.जानकर साहेब व पोलीस कर्मचारी नक्कीच शोधून काढतील असा माझा पोलिस प्रशासनावर विश्वास आहे:गुणवंत पाटील
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा