Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १५ एप्रिल, २०२०

सर्वोदय नागरी सहकारी पतसंस्थेने पोलीस स्टेशन,सईबाई मोटे सामान्य रूग्णालय व बँकेच्या आवारात सँनिटायझर टनलची उपलब्ध करून दिला आहे,



शेगाव प्रतिनिधी शहरातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सामाजिक भान ठेवुन सर्वोदय नागरी सहकारी पतसंस्थेने पोलीस स्टेशन,सईबाई मोटे सामान्य रूग्णालय व बँकेच्या आवारात सँनिटायझर टनलची उपलब्ध करून दिला आहे, यामुळे पोलिस, आरोग्य सेवा देणारे कर्मचारी व बँन्केत येणाऱ्या ग्राहकांना याचा लाभ होवुन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत होईल

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पोलीस, आरोग्य कर्मचारी, बँकेचे कर्मचारी झटत आहेत अशा कर्मचाऱ्यांना सुरक्षा देण्यासाठी सर्वोदय नागरी सहकारी पतसंस्थेने स्वयंचलित सँनिटायझर टनल  पोलिस स्टेशन, सईबाई मोटे रूग्णालय व बँन्क परिसरात लावले आहे या टनल मधुन गेल्यावर अवघ्या ८ सेकंदात सँनिटायझरचा स्प्रे अंगावर होऊन मनुष्य निर्जंतुक होऊन बाहेर येतो या सँनिटायझर टनल मुळे कोरोना लढाईत फायटर म्हणून काम करीत असलेल्या कर्मचारांना दिलासा देण्याचा हा छोटासा प्रयत्न संस्थेने केला आहे

या टनलच्या लोकार्पणाला पोलिस अधिकारी, आरोग्य अधिकारी व संस्थेचे संचालक व कर्मचारी उपस्थित होते अशी माहिती सर्वोदय पतसंस्थेचे सरव्यवस्थापक हरिष माटा यांनी दिली


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध