Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ८ एप्रिल, २०२०
Home
/
Unlabelled
/
अजित थोरबोले प्रांताधिकारी फैजपूर यांच्या हाकेला आटावाडे सरपंच गणेश महाजन, यांची साथ...
अजित थोरबोले प्रांताधिकारी फैजपूर यांच्या हाकेला आटावाडे सरपंच गणेश महाजन, यांची साथ...
प्रतिनिधी रावेर आज दि 8 एप्रिल 2020 रोजी मौजे अटवाडे ता रावेर जि जळगांव येथील गणेश महाजन सरपंच यांचे पुढाकाराने अटवाडे गावातील 60 गरजू व गरीब कुटुंबाना गहू,तांदूळ, तुरडाळ, तेल,गुळ, मीठ, मिरची पावडर, शेंगदाणे, चहा पावडर, साखर असलेले किट मा गणेश महाजन सरपंच, मा प्रकाश तायडे ग्रामसेवक ,मा शैलेश झोटे तलाठी ,मा नगीन कुयटे पोलीस पाटिल, मा उज्वल अग्रवाल प्रगतशील शेतकरी,मा चंद्रकांत पाटील उपसरपंच ,मा सुनिल महाजन ,ग्रा प सभासद मा योगेश पाटील सामाजिक कार्यकर्ते, मा प्रविण धनायते प्रगतशील शेतकरी, दामोदर कचरे प्रगतशील शेतकरी यांचे सहकार्याने मा डॉ अजित थोरबोले प्रांत अधिकारी फैजपूर, व मा उषाराणी देवगुणे तहसीलदार रावेर यांचे हस्ते किट वाटप करणेत आले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,रावेर आणि यावल तालुक्या मधील तमाम नागरिकांना विनंती करण्यात येते की,या अडचणीच्या परिस्थितीमध्ये गोरगरिब जनतेवर उपासमारीची वेळ आली आहे..तरी विनंती की,जेवढे शक्य असेल तेवढे जीवनावश्यक वस्तू आपण आपल्या जवळच्या ग्रामपंचायत,नगरपालिका किंवा तहसीलदार कार्यलयात जमा करावे त्यांचा
मी आभारी राहिन असे
श्री .अजित थोरबोले प्रांताधिकारी फैजपूर, यांनी जाहीर आवाहन केले होते. याला प्रतिसाद साथ म्हणून आटवाडे लोकनियुक्त सरपंच गणेश महाजन यांनी गोरगरीबांना अन्न दान केले.व सर्व सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते, यांनीही या संकट समयी संवेदनशीलता दाखवून थोड्या प्रमाणात हातभार लावावा अशी श्री गणेश महाजन यांनी साद सर्वांना घातली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा