Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, ८ एप्रिल, २०२०

मुलगी प्राजक्ताने दिला वडिलांच्या पार्थिवाला अग्निडाग


 
 
उंटावद (प्रतिनिधी) शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथील महेंद्र नथ्थु वाघ (न्हावी) (वय 43) यांचे काल सोमवार दि.6 रोजी रात्री 1:30 वाजेच्या सुमारास अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी व एकलती एक मुलगी प्राजक्ता असा परीवार आहे.  

घराण्याला कुलदीपक म्हणून तसेच शेवटच्या क्षणी अग्नीडाग देण्यासाठी मुलगाच पाहिजे, असा साधारणपणे समज असतो.  
मात्र वाघाडी गावातील नाभिक समाजातील या एकुलत्या एक मुलीने मुलाची कोणतीही उणीव भासू न देता पित्याला खांदा देऊन अग्नीडागही देत समाजासमोर एक आदर्श निर्माण केला असल्याचा सूर या निमित्ताने उमटत आहे.
समाजाच्या नियमानुसार मुलगा हाच आई-वडीलांना अग्नीडाग देत असतो व त्यानंतरच त्यांना मोक्ष किंवा शांती मिळते अशी परंपरा प्रचलित आहे. परंतु याठिकाणी मयत महेंद्र नथ्थु वाघ यांना एकच मुलगी असल्याने याच मुलीने आपल्या वडीलांच्या पार्थिवाला खांदा दिला. आपल्या वडीलांची शेवटची इच्छा पुर्ण करत शेवटचा अग्नीडागही मुलीनेच दिला.

मन हेलावून टाकणारा हा प्रसंग सोमवारी वाघ कुटुंबावर ओढावला व सर्वांनी याबाबत हळहळ व्यक्त करत मुलीच्या धाडसाचे कौतुकही केले.नुकतीच दहावीची परिक्षा दिलेल्या प्राजक्ताने परंपरेच्या भिंती तोडत मुलगीही वंशाचा दिवा ठरू शकते हे दाखवून दिल्याने मुलीच्या धाडसाचे कौतुकही होत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध