Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ३ एप्रिल, २०२०

धडगाव व पाडली येथे गरजूंना किराणा वाटप




देशातील कोरोना महामारी संकट लक्षात घेत आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी 21 दिवसाच्या कर्फ्युचे आवाहन देशात केले आहे.ह्यामुळे स्वतःची व स्वतःच्या कुटुंबाची दरदिवसा मोलमजुरी करून पोटगी भरणाऱ्या अनेक परिवारांची बेअवस्था झाली आहे ह्या बाबी लक्षात घेत श्रीरामनवमी व श्री राजेश्वर महाराज जयंतीचे औचित्य साधून आंजना कलबी ग्रुप धडगाव ह्यांनी अक्राणी तालुक्यात असलेले पाडली येथील बोरकीपाडा व एकतोडपाडा येथे गरजू आदिवासी बांधवांना एक ते दिड किलोमीटर डोंगरदऱ्यावर पायदळ करत  व धडगाव शहरातील गरजूंना मदतीच्या भावनेने तांदूळ,तुवर डाळ,चटणी,मसाला,हळद,मीठ,तेल,साखर,चहा पुडा इ.वस्तू किराणा स्वरूपात वाटप केले व लहान मुलांना बिस्कीट पुडे वाटप केले. 

या वेळी महाराष्ट्र राज्य युवा परिषदेचे,अक्राणी तालुका समन्वयक जितेंद्र दिलीप ढोले यांनी पाडली येथील ग्रामस्थांशी घरोघरी जाऊन संपर्क साधून घरीच रहा,घराबाहेर पडू नका,शासनाच्या व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा व देशावर आलेल्या संकटाला सामोरे जा असा संदेश देत आम्ही तुमच्या संकटात तुमच्या सोबत आहोत असा दिलासाही गरजूंना दिला.आंजना कलबी ग्रुपचे अध्यक्ष अनिल पटेल यांनी गरजूंची सेवा करून धन्य झालो असे भावनिक उदगार काढले.

या वेळी आंजना कलबी ग्रुपचे सदस्य कान्हाराम पटेल,हनुमान पटेल,रुपेश पटेल,नरपत पटेल, रमेश पटेल,हितेश पटेल,अशोक पटेल इ. सहकार्य केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध