Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ३ एप्रिल, २०२०

कोपरगांवकर भोईसमाज पिडीतांच्या मदतीला





कोपरगांव प्रतिनिधी:कोरोनाच्या लागणमुळे अनेकांचे जीवन काही अकड्यावरुन संपल्याचे दिसत आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान मा नरेंद्रजी मोदी साहेब व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या आवाहनानुसार जनता ही आपल्या घरात बसुन कोरोनाचा सामना करत आहे; 

परंतु हातावर पोट असलेल्यांना काही ठिकाणी समाजसेवेच्या भावनेतून मदत करण्यासाठी काही सामाजिक सेवाभावी संस्था, सामाजिक संघटना वैद्यकीय नियमांचे पालन करुन पुढे जाऊन मदत करतांना दिसत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील साईंच्या चरणांची पवित्रभुमि म्हणून ज्या शहराचा उल्लेख केला जातो, तसेच गोदावरी नदीच्या तीरावर बसलेले शहर म्हणजे कोपरगांव शहर... या शहरातील सामाजिक कार्यकर्ते यांनी आपण समाजाचं काही तरी देणं लागतो या भावनेतून गरिब आणि संकटात सापडलेल्या अंध, दिव्यांग जनतेला उत्तरदायी होतांना दिसत आहे. शहरात कोरोना व्हायरसच्या कठीण समयी श्री अर्जुन मोरे व त्यांचा भोईसमाज क्रांतीदल मित्रपरीवार शहरात अन्नदान करतांना दिसतो आहे. 

यात श्री योगेशभाऊ मोरे भोईसमाज युवाक्रांतीदल महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, अर्जुनमोरे स्वत: भोईसमाज युवाक्रांतीदल महाराष्ट्र राज्य प्रसिद्धीप्रमुख, विजयभाऊ मोरे भोईसमाज युवाक्रांतीदल महाराष्ट्र अहमदनगर जिल्हाअध्यक्ष, भिमाभाऊ मोरे, मनोज मोरे भोईसमाज क्रांतीदल कोपरगांव तालुका संघटक तसेच किरणभाऊ लाडे भोईसमाज क्रांतीदल कोपरगांव तालुका सचिव त्यांत्या सोबत त्यांचा मित्रपरिवार मदत करतांना दिसत आहेत. संकट समयी मदतीला धावून जाणे हे आम्ही आमचे सामाजिक कर्तव्य समजतो असे सामाजिक कार्यकर्ते अर्जुनमोरे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना वार्तालाप केला.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध