Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २६ एप्रिल, २०२०
कोरोनाची साखळी तोडू;माणुसकीची साखळी जोडु
प्रतिनिधी.उमाकांत गुरव चोपडा सद्या राज्यात कोविड 19 या आजाराने थैमान घातलेले असून त्यामुळे चोपडा गुरव समजातील गोर गरीब लोकांना किराणा साहित्य सुविधा नियमित स्वरूपात उपलब्ध होण्यास बऱ्याच अडचणी येत आहेत. म्हणून चोपडा गुरव समाजातील हातावर पोट असलेल्या कुटुंबांना किराणा साहित्य देण्याचा, त्यांचा घरातील चूल विझू नये यासाठी चोपडा गुरव समाजातील दानशूर दात्यांचे प्रयत्न.
दि.25 एप्रिल 2020 रोजी गुरव समाजातील सल्लागार श्री संजय पंडित गुरव सल्लागार श्री बीपीन ओंकार गुरव
अध्यक्ष श्री उमाकांत अशोक गुरव सचिव श्री प्रशांत सुभाष गुरव श्री हरीश मंगल गुरव तसेच महिला अध्यक्ष सौ शारदाबाई अशोक गुरव उपाध्यक्ष संगीताबाई महेश गुरव हे आपल्या चोपडा शहरातील समाजाच्या गोरगरीब लोकांच्या मदतीस धावले. यात त्यांनी समाजातील एकूण 21 कुटुंबियांना तेल,साखर,चनादाळ,मसूर डाळ,मुगडाळ,चवडी,चहा पावडर,मिरची पावडर,हळदी पावडर,मिठाची पिशवी,अंघोळीचे साबण,कपड्यांचा साबण याप्रकारे त्यांनी मदत केली. व ते म्हणाले आज प्रत्येकाला वाटतंय आपणही काही सामाजिक जबाबदारी उचलावी,आपणही कुणालातरी काहीही मदत करावी.आपण समाजाचे देने लागतो. असा सामाजिक उपक्रम राबविला.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नरडाणा / शिंदखेडा प्रतिनिधी :- धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांवर नरडाणा पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ आरोपी व एक...
-
नरडाणा / शिंदखेडा प्रतिनिधी : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांवर नरडाणा पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ आरोपी व एका ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा